नांदेड, गडचिरोली जिल्ह्यांत एसडीआरएफची प्रत्येकी एक तुकडी

मुंबई : राज्यात सर्वदूर पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या -State Disaster Response Force (SDRF) तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. त्यात नांदेड आणि गडचिरोली (Nanded, Gadchiroli) या जिल्ह्यांत गेल्या काही वर्षांतील अनुभव पहाता खबरदारी म्हणून एसडीआरएफची प्रत्येकी एक तुकडी तैनात करण्यात आली आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली. (One unit each of SDRF in Nanded, Gadchiroli districts)

 

गेल्या वर्षी विविध नैसर्गिक आपत्तींमुळे ४३७ जण मरण पावले असून ६८० जखमी झाले आहेत, तर ४३४८ जनावरे मरण पावली आहेत. यंदा ७९०० आपदा मित्रांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. राज्यातील संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

 

One unit each of SDRF in Nanded, Gadchiroli districts

पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली आणि पुणे (Palghar, Thane, Raigad, Ratnagiri, Kolhapur, Sangli, Pune) या जिल्ह्यांत एनडीआरएफची प्रत्येकी एक तुकडी तैनात करण्यात आली आहे, तर नांदेड आणि गडचिरोली या जिल्ह्यांत एसडीआरएफची प्रत्येकी एक तुकडी तैनात करण्यात आली आहे.

 

 

एनडीआरएफच्या सहा, तर एसडीआरएफच्या दोन तुकड्यांमधील पथकांना भोजन, निवास आणि जिल्हा अंतर्गत प्रवास यासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या पथकांना मुख्यालयापासून नियोजित जिल्ह्यांत जाण्यासाठी प्रवास खर्च वितरीत करण्यात आला आहे. त्यानुसार पुणे जिल्ह्याला एक कोटींचा निधी देण्यात आला आहे, अशी माहिती पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांनी दिली.

 

 

 

Local ad 1