पुणे : “अहंकाराचा त्याग करुन निरंकार प्रभूला हृदयामध्ये वसवून खरेखुरे मानवी जीवन जगावे” असे प्रतिपादन निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षा महाराज यांनी केले. औरंगाबादच्या बिडकीन डीएमआयसी विभागात पारपडलेल्या महाराष्ट्राच्या 56 व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या दुसऱ्या दिवशी देश-विदेशातून लाखोंच्या संख्येने आलेल्या विशाल मानव परिवाराला संबोधित करताना व्यक्त केले. (One should renounce ego and establish nirankara in the heart: Mata Sudiksha Maharaj)
अहंकारामुळे मनुष्य स्वत:ला श्रेष्ठ मानत असतो आणि मनामध्ये भौतिक वस्तूंना ईश्वरा पेक्षा अधिक मौल्यवान मानत असतो. परिणामी तो जीवनाच्या वास्तविकतेपासून अनभिज्ञ राहतो आणि खरेखुरे मानवी जीवन जगू शकत नाही. याउलट जर मानवाने ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून ईश्वराशी नाते जोडले आणि सदोदित ईश्वराची जाणीव ठेवली तर त्याचे जीवन मौल्यवान होऊन जाते. (One should renounce ego and establish nirankara in the heart: Mata Sudiksha Maharaj)