(Once the inquiry is over)”एकदाच होऊन जाऊद्या दुध का दुध पाणी का पाणी” : अनिल देशमुख
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रामध्ये राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी गोळा करण्याचे काम सचिन वाझेला दिले होते, अशा गंभीर आरोप केला. त्यानंतर राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलने केली. त्यावर आता एकदाची चौकशी होऊन दुध का दुध आणि पाणी का पाणी होऊन जाऊद्या, अशी मागणी अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या पत्रात केले आहे. (Once the inquiry is over)
‘राज्य शासनाने १७ मार्च २०२१ ला मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन हटवल्यानंतर परमबीर सिंग यांनी जे माझ्यावर आरोप केले त्यामध्ये काहीही तथ्य नाही. त्यामुळे आपणांस विनंती करतो की, त्यांनी जे आरोप लावले आहेत, या संपूर्ण प्रकरणाची त्वरित चौकशी करुन ‘दूध का दूध पानी का पानी’ करावे,’ असे गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.(Once the inquiry is over)
मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांना परमबीर सिंग यांनी माझ्यावर जे आरोप केलेत त्याबद्दल चौकशी लावून, "दूध का दूध, पानी का पानी" करावे अशी मागणी केली होती. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याची चौकशी लावली तर, मी त्याचे स्वागत करीन.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 24, 2021
सत्यमेव जयते… pic.twitter.com/f2oJjFhO8A