...

मुंबईत ओमायक्रोनचे आढळले ’इतके’ रुग्ण

मुंबई : राज्यात ओमायक्रोन विषाणूचे रुग्ण दिवसागणिक वाढत असून, रविवारी राज्यात तब्बल 31 कोरोना बधितांना ओमायक्रोनची लागण झाल्याची  माहिती समोर आली. त्यात मुंबईतील 27 जण आहेत. ठाण्यातील दोन तर पुणे ग्रामीण आणि अकोला येथील एका रुग्णांचा समावेश आहे. (Omycron in Mumbai; So many patients were found on the same day) 

 

omicron | पुण्यातही ओमायक्रॉनचा शिरकाव ; पिंपरीत 6, पुण्यात 1 रुग्ण आढळला

 

 

राज्यात आतापर्यंत आढळणार्‍या ओमायक्रॉन बधितांची संख्या 141 झाली आहे. त्यातील 61 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. रविवारी 31 ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले असून, त्यातील 18 वर्षाखालील सहा, 60 वर्षावरील तीन आहेत.  17 पुरुष तर 14 महिलांचा समावेश असून, 31 पैकी 30 जणांचा आंतरराष्ट्रीय प्रवासाचा इतिहास आहे. तर एक जण संपर्कातील आहे. 22 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.  आजाराचे स्वरुप 29 जणांना कोणतीही लक्षणे नाहीत तर 2 जणांना सौम्य लक्षणे आहेत, असे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले. (Omycron blast in Mumbai; So many patients were found on the same day)

Local ad 1