(Officers who do not know where to carry out agitation..) आंदोलन कुठं करावं हे न कळणारे अधिकारी…

नवनी वर्षात कोरोना आपले दरदिवशी उच्चांक मोडत असून, शासनाने स्थानिक स्थितीचा आढावा घेऊन प्रशासनाने निर्बंध लादावेत, असा आदेश दिला. त्यातच विधिमंडळाच अधिवेशन झाले. त्यात विरोधी पक्षांनी दोन्ही सभागृह डोक्यावर घेतलं. ते त्यांच काम होतं, त्यांनी केलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षा पुढे ढकल्याच्या आदेशाला विद्यार्थ्यांनी विरोध केला. ते रस्त्यावर उतरले भाजपचे आमदार गोपिचंद पडळकरांनी त्यात उडी घेतली. विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परिक्षा निर्णयाचा फेरविचार करुन नवीन तारीख जाहीरही केली.

दहा महिन्यांपुर्वी एमपीएससीचा (MPSC) निकाल लागला. त्यात यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्वाईन करुन घेतले जात नाही. असा आरोप करुन आंदोलनाच्या पवित्र्यात आहेतय. आंदोलन करणं हे त्यांचा अधिकार आहे. मात्र, आंदोलन कुठं करावं, याचे साधे ज्ञान नसणारे उमेदवार जर उद्या नियुक्त्या मिळाल्यानंतर ते आपल्या पदाला न्याय देऊ शकतील का ? आंदोलन हे जिल्हाधिकारी, विभागीय आय़ुक्त, मंत्रालयासमोर किंवा संबंधित विभागाच्या कार्यालयासमोर करणे अपेक्षित आहे. मात्र, या बहाद्दरांनी नवीपेठेतील पुणे श्रमिक पत्रकार संघासमोर आंदोलन करणार असल्याचा निरोप माध्यम प्रतिनिधींनी पाठविला. (Officers who do not know where to carry out agitation..)

“उद्या दिनांक 13.मार्च 2021 रोजी सकाळी ठीक 10.30 वाजता पत्रकार भवन पुणे येथे राज्यसेवा परीक्षा 2019 मध्ये उत्तीर्ण झालेल्या पण अजून नियुक्ती रखडलेल्या सर्व 413 उमेदवारांचे आंदोलन होणार आहे” (Officers who do not know where to carry out agitation..)

या ठिकाणी विद्यार्थ्यी आले पण त्यांच्यासोबत भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर आले. जे उमेदवारांनी यश मिळवले आहे, त्यांना नियुक्त्या अपेक्षित आहेत, की माध्यमांतून मिळणारी प्रसिद्धी यावर विचार होणे आवश्यक आहे. गेल्या वर्षभरापासून शासन- प्रशासन आणि नागरीक कोरोनाशी लढा देत आहेत. शासनाने कोरोनाविषयी उपाययोजनांना प्राधान्य द्यावे की या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांना यावर विचार नको का करायला.(Officers who do not know where to carry out agitation..)

Officers who do not know where to carry out agitation..
Local ad 1