पुणे : राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (State Anti-Corruption Department) 1 जानेवारी ते 20 एप्रिल दरम्यान लावलेल्या 272 सापळ्यात 387 अधिकारी-कर्मचाऱ्यांना अटक (Officers and employees arrested) करण्यात आली. तसेच अपसंपदा (Apocalypse) आणि अन्य भ्रष्ट्राचारा प्रकरणात (Corruption case) एकूण 399 आरोपींना अटक करण्यात आली. त्यामुळे दररोज सुमारे अडिच सापळे यशस्वी होत आहेत. (399 officers-employees who took bribes in the state in ACB’s trap)
1 जानेवारी ते 20 एप्रिल दरम्यान राज्यातील राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागात आठ परिक्षेत्रात दररोज सुमारे अडिच सापळे यशस्वी झाले आहेत. त्यात 378 आरोपींनी अटक करण्यात आली. तसेच अपसंपदाचे पाच गुन्हे दाखल करण्यात आले. तर अन्य भ्रष्टाचाराप्रकरणी एक गुन्हा दाखल करण्याता आला असून, तीन आरोपींना अटक केली आहे. एकूण 278 गुन्हे दाखल झाले असून, त्यात एकूण 399 आरोपींना अटक करण्यात आली. (399 officers-employees who took bribes in the state in ACB’s trap)
मुंबई परिक्षेत्रात 14 सापळे यशस्वी झाले असून, 16 आरोपींना अटक केली आहे. अपसंपदाचे 4 गुन्हे दाखल करण्यात आले. अन्य भ्रष्ट्रारात एक गुन्हा दाखल झाला असून, एकूण 19 गुन्ह्यात 25 आरोपी अटक करण्यात आली. (399 officers-employees who took bribes in the state in ACB’s trap)
ठाणे परिक्षेत्रात 35 सापळ्यात 49 आरोपींना अटक करण्यात आली. पुणे परिक्षेत्रात 52 सापळ्यात 74 आरोपी चतुर्भूज झाले आहेत. नाशिक विभागात 53 सापळ्यात 83 आरोपी अटक करण्यात आली. नागपूरमध्ये 30 सापळ्यात 45 आरोपींना अटक केली. अमरावतीमध्ये 22 सापळ्यात 32 आरोपींना लाच घेताना अटक करण्यात आली. औरंगाबादमध्ये 46 सापळ्यात 64 तर नांदेड परिक्षेत्रात 20 सापळ्यात 24 आरोपींना अटक केली आहे. (399 officers-employees who took bribes in the state in ACB’s trap)
नाशिक परिक्षेत्रात सर्वाधिक सापळे
राज्यात एकूण नऊ परिक्षेत्र असून, त्यात नाशिक परिक्षेत्रात सर्वाधिक 53 सापळे यशस्वी झाले असून, त्यात 83 आरोपींना अटक करण्यात आली. त्यापाठोपाठ पुणे क्षेत्रात 52 सापळ्यात 74 आरोपींना गजाआड करण्यात आले. तर सर्वाधिक कमी 14 सापळ्यात 16 जणांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे मुंबईत अपसंपदेचे चार गुन्हे दाखल झाले असून, सहा आरोपींना अटक करण्यात आली. तसेच अन्य भ्रष्टाचार प्रकरणी एक गुन्हा दाखल करण्यात आला.