तमुच्या तालुक्यात किती गट आणि गण आहेत?, जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणच्या प्रारूप आराखड्यावर “या” तारखेपर्यंत घ्या हरकत

नांदेड :  आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची माहिती जाणुन घेण्यासाठी इच्छुक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. सध्या गट आणि गणांच्या प्रभाग रचनेवर काम सुरु आहे. त्यावर आपली हरकत, सूचना जिल्हाधिकारी यांच्याकडे नोंदविता येते. त्याची विभागीय आयुक्तांकडे सुनावणी होईल. त्यानंतरच गट आणि गण निश्चित होणार आहेत. (Objections to the draft plan of Zilla Parishad group and Panchayat Samiti group should be reported by this date)

 

 

राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission)  जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांच्या प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. गट-गणांच्या प्रारूप प्रभागरचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी विभागीय आयुक्तांकडे २३ मेपर्यंत सादर करणार आहेत. विभागीय आयुक्त त्यास ३१ मेपर्यंत मान्यता देतील. या प्रारूप प्रभागरचनेची अधिसूचना जिल्हाधिकारी २ जून रोजी प्रसिद्ध करणार आहेत. नांदेड जिल्ह्यात एकूण ७३ जिल्हा परिषद गट आणि १४६ पंचायत समिती गण निर्माण झाले आहेत. (Objections to the draft plan of Zilla Parishad group and Panchayat Samiti group should be reported by this date)

 

 

जिल्ह्यातील जिल्हा परिषद गटांची संख्या 63, तर पंचायत समिती गणांची संख्या 126 होती. लोकसंख्येमध्ये झालेल्या वाढीमुळे गट आणि गणांच्या प्रभागरचनेत बदल करण्यात आले आहेत. नवीन गट ४२ हजार लोकसंख्येचा तर पंचायत समिती गण हा २१ हजार लोकसंख्येचा राहणार आहे. लोकसंख्येच्या निकषानुसार आता नांदेड जिल्हा परिषदेचे ७३ गट, तर पंचायत समित्यांचे १४६ गण झाले आहेत. मुखेड तालुक्यात सर्वाधिक आठ तर सर्वात कमी उमरी आणि धर्माबाद तालुक्यात प्रत्येकी दोन गट आणि चार पंचायत समिती गण असणार आहेत. (Objections to the draft plan of Zilla Parishad group and Panchayat Samiti group should be reported by this date)

 

 

नांदेड जिल्ह्यातील गट (कंसात गण)

माहुर -३ (६), किनवट – ७ (१४), हिमायतनगर – ३ (६), हदगांव – ७ (१४), अर्धापूर  -३ (६), नांदेड – ५ (१०), मुदखेड – ३ (६), भोरक  – ३ (६), उमरी – २ (४), धर्माबाद – २ (४), बिलोली -४ (८), नायगांव  -५ (१०), लोहा -६ (१२), कंधार -७ (१७), मुखेड – ८ (१६) आणि देगलूर -५ (१०). (Objections to the draft plan of Zilla Parishad group and Panchayat Samiti group should be reported by this date)

२७ जून रोजी अंतिम रचना

जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकती आणि सूचना २ ते ८ जूनदरम्यान जाहीर करता येतील. विभागीय आयुक्‍त प्राप्त हरकतींवर २२ जूनपर्यंत निर्णय घेतील. जिल्हाधिकारी २७ जून रोजी अंतिम प्रभागरचना शासन राजपत्रात प्रसिद्ध केले जाणार आहे. (Objections to the draft plan of Zilla Parishad group and Panchayat Samiti group should be reported by this date)

Local ad 1