पुणे । वंचित बहुजन आघाडीने आपल्या 20 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. त्यात ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके (OBC leader Laxman Hake) आणि नवनाथ वाघमारे यांचा समावेश आहे. त्यामुळे आता हाके वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचार करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी रुग्णालयातून एक व्हिडीओ प्रसारीत करुन ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला आहे. (OBC leader Laxman Hake is the star campaigner of Vanchit Bahujan Aghadi)
आर्थिक व्यवहाराच्या नियमांत आजपासून बदलले ; सर्व सामान्यांच्या खिशावर काय होणार परिणाम जाणून घ्या
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या 20 स्टार प्रचारकांमध्ये रेखा ठाकूर, भिमराव आंबेडकर, अशोक सोनवणे, अनिल जाधव, अंजली आंबेडकर, अरुण जाधव, भास्कर भोजणे, डॉ.धैर्यवर्धन पुंडकर, दिशा पिंकी शेख, गोविंद दळवी, हेमराज उईके, प्रा. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे, राजेंद्र पाठोडे, संविधान गांगुर्डे, सर्वजीत बनसोडे, सिद्धार्थ मोकाले, सुजात आंबेडकर आणि तय्यब जफर यांचा समावेश आहे.
https://x.com/VBAforIndia/status/1852741198844215465?t=kaxkcUqKBSHW8d2M3k1s2g&s=08
प्रकाश आंबेडकर यांचे रुग्णालयातून केले आवाहन
निवडणुकीच्या धामधमुकीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Vanchit Bahujan Aghadi President Prakash Ambedkar) यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे. ऐन निवडणुकीच्या तयारीत आपल्याला दिशा दाखवणारा नेता रुग्णालयात असल्याने कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पण प्रकाश आंबेडकर यांनी आपले कार्यकर्ते, नेते आणि मतदारांसाठी खास संदेश जारी केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील मतदारांना भावनिक आवाहन केले आहे. त्यांच्यावर पुण्यातील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची नुकतीच अँजिओप्लस्टी झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमित प्रकाश आंबेडकर यांना आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. यात ते मतदारांना भावनिक साद घालताना दिसत आहेत. आपले आमदार निवडून आले, तर आरक्षणावरील हल्ला थांबवता येईल, असा संदेश यांनी प्रकाश आंबेडकरांना दिला आहे.