...

आता निवडणुक नाही, पावसात कशाला भिजायच, राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला

पुणे :  पुण्यातील गणेश कला क्रीडा मंचाच्या सभागृहात मनसे आध्यक्ष राज ठाकरे यांची चर्चित सभा पारपडली. “आपल्या सभेला हॉल परवडत नाहीत, एसपी कॉलेजला विचारलं होतं, पण त्यांनी सभेसाठी नकार दिला. आता आम्हांला नाही तर कुणालाच नाही, असे म्हणताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पावसात भिजून भाषण करावं म्हटलं पण आता निवडणुका नाही, काही नाही, उगाच कशाला भिजत भाषण करा?” अशा शब्दात राज ठाकरे यांनी शरद पवार यांचे नाव न घेता टोला लगावला. (Now there is no election, why get wet in the rain, Raj Thackeray slammed Sharad Pawar)

 

 

 

राज ठाकरे अयोध्या दौऱ्यविषयी काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष होते. अयोध्या दौऱ्याच्या विरोधाला महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली. या दौऱ्याच्या निमित्ताने एक सापळा रचला गेला होता. दौरा तुर्तास रद्द झाल्याने अनेकांना वाईट वाटलं. बाबरीच्या वेळी अनेक कारसेवकांना मारण्यात आले, त्यांची प्रेतं फेकली गेली. मला त्यांचेही दर्शन घ्यायचे होते. मी हट्टाने जायचे ठरवले असते तरी हजारो माझे सैनिक अयोध्येला आले असते. आणि तिथे जर काही झाले असते तर आपली कार्यकर्ते अंगावर गेली असती. तुमच्यावर केसेस टाकल्या गेल्या असत्या. हकनाक तुमच्या मागे ससेमिरा लागला असता. मी आपली पोरं अशी हकनाक घालवणार नाही, असेही राज ठाकरे म्हणाले. (Now there is no election, why get wet in the rain, Raj Thackeray slammed Sharad Pawar)

 

 

 

मी माफी मागावी याची मागणी केली गेली, यांना आता 12-14 वर्षांनंतर जाग आली. यातून चुकीचे पायंडे पडत आहेत. विषय माफी मागण्याचाच आहे ना मग गुजरातमध्ये अल्पेश ठाकूर नावाच्या नेत्यांनं यूपी,बिहारच्या लोकांना हाकलून दिलं. ती लोकं मुंबईत आले, इथं आओ जाओ घर तुम्हारा. तिथं गुजरातमध्ये कोण माफी मागणार, असं राज ठाकरे म्हणाले. (Now there is no election, why get wet in the rain, Raj Thackeray slammed Sharad Pawar)

 

 

राणा दाम्पत्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ते मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणायला जाणार होते. मातोश्री काय मशीद आहे काय? असा सवाल त्यांनी केला. मोठा गोंधळ, आरोप प्रत्यारोप झाले. एवढा गोंधळ होऊन संजय राऊत आणि राणा दाम्पत्य लडाखमध्ये एकत्र जेवताना दिसले. हे सगळे ढोंगी आहेत, असं राज ठाकरे म्हणाले.  (Now there is no election, why get wet in the rain, Raj Thackeray slammed Sharad Pawar)

Local ad 1