...

आता मराठी बोलणाऱ्यांची जबाबदारी वाढली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

पुणे : मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मराठीला राजमान्यता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी दिली. आता मराठी बोलणाऱ्यांची जबाबदारी वाढली आहे. आपली वाचनसंस्कृती जपण्याचे काम करायचे आहे, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ हा उपक्रम राज्यभर राबवता येईल, महोत्सवाला शासनाकडून सर्वोतोपरी मदत केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. (Now the responsibility of Marathi speakers has increased – Chief Minister Devendra Fadnavis)