शेतातील नुकसानीची माहिती देण्यासाठी आता सहा पर्याय
पुणे Agriculture news : राज्यातील बहुतांश भागात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत. (Due to heavy rains, kharif crops were completely destroyed) या पिकांचा अनेकांनी विमा संरक्षण घेतलं आहे. नुकसानीची माहिती 72 तासांत विमा कंपनीला देणे आवश्यक आहे. (Losses must be reported to the insurance company within 72 hours) मात्र, कंपनीचा नंबर व्यस्त आहे, तालुक्याच्या ठिकाणी शेतकरी जाऊ शकत नाहीत. त्यामुळे माहिती वेळेत न पोहोचल्याने विमा नाकारला जाऊ शकतो, अशी भीती आहे. परंतु शेतकऱ्यांनो घाबरू नका, कृषी विभागाने आता सहा पर्याय उपलब्ध करून दिली आहेत. (Now six options for reporting crop damage)
नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या अधिसूचित पिकाचे नुकसान विमा कंपनीला कळविण्यासाठी सहा पर्याय उपलब्ध करून दिले जात आहेत, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत आपल्या विमा संरक्षित पिकाचे नुकसान झाले याबाबतची पूर्वसूचना आपल्या संबंधित विमा कंपनीला देणे आवश्यक आहे. त्यासाठी सहा पर्यायांचा वापर करता येईल, असे सांगण्यात आले. (Now six options for reporting crop damage)
पीक विम्यासाठी कोण ठरत पात्र
पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती ही बाब महत्त्वाची आहे. विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, गारपीट ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी आग आदी स्थानिक नैसर्गिक आपत्ती आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास त्या अधिसूचित पिकाचे नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येते. विमा संरक्षित क्षेत्र पडलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढून किंवा ओसंडून वाहणारी विहीर किंवा पुराचे पाणी शेतात शिरून शेत जलमय राहिल्यामुळे पिकाचे नुकसान झाल्यास त्यांना विमा संरक्षण मिळतो.(Who qualifies for crop insurance)
“या” सहा पैकी एका पर्यायाचा करा वापर
क्रॉप इन्शुरन्स अॅप, विमा कंपनी टोल फ्री क्रमांक, (Crop Insurance App, Insurance Company Toll Free Number,) विमा कंपनीचा ई-मेल, विमा कंपनीचे तालुकास्तरीय कार्यालय, कृषी विभागाचे मंडळ कृषी कार्यालय आणि ज्या बँकेत विमा जमा केला ती बँक शाखेत (At a bank branch) माहिती देता येईल, असे स्पष्ट करण्यात आले. (Now six options for reporting crop damage)