पुणे. महाविकास आघाडीमध्ये हडपसर मतदारसंघ (Hadapsar constituency) काँग्रेस, शिवसेना (उबाठा) किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Congress, Shiv Sena (UBT) or NCP (Sharad Pawar)) वाट्याला आला तरी, हा मतदार संघ मुस्लिम समाजाला सोडावा, अशी एकमुखी मागणी पुणे मुस्लिम कॉन्फरन्सच्या राज्यव्यापी बैठकीत घेण्यात आला. तसेच उपस्थित कार्यकर्ते व नागरिकांनी रशिद शेख (Rashid Sheikh) यांनी हडपसर मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली. (Nominate Rashid Shaikh from Hadapsar Constituency)
लोकसभा निवडणुकांमध्ये कोणत्याही अटी व शर्ती शिवाय मुस्लिम समुदायाने केलेल्या मतदानाच्या अनुषंगाने तसेच योग्य प्रतिनिधित्वाचा मुद्द्यावर महाविकास आघाडीने यापूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता या निमित्ताने करावी, अशी मागणी नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या वतीनेही यावेळी करण्यात आली. (Nominate Rashid Shaikh from Hadapsar Constituency)
मुस्लिम समाजास उमेदवारी न दिल्यास महाविकास आघाडीचा हक्काचा मतदार नाराज होऊन, तो आपला असंतोष अन्य मार्गाने व्यक्त करण्याची शक्यता आहे. हरियाणा येथे भारतीय जनता पक्षाचा झालेला विजय हा धक्कादायक स्वरूपाचा असून, इंडिया अलायन्स च्या धोरसोड वृत्तीमुळे अल्पसंख्यांक व धर्मनिरपेक्ष मतदारांच्या नाराजीचाच हा फटका आहे. त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होऊ नये, असे आम्हाला वाटते त्यामुळे महाविकास आघाडीने तात्काळ निर्णय घेणे अपेक्षित आहे.
हडपसर विधानसभा मतदारसंघातून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व अल्पसंख्यांक समाजाचे नेते रशीद शेख यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन जमीयत उलमा संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुक्ती शाहिद यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने केली आहे. (Nominate Rashid Shaikh from Hadapsar Constituency)
हडपसर विधानसभा मतदार संघात मुस्लिम समाजाला उमेदवारी दिल्यास जवळपास पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघात व पश्चिम महाराष्ट्रातील 84 मतदार संघात याचा सकारात्मक संदेश जाईल. महाविकास आघाडीने माझ्या उमेदवारी बाबत निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा रशिद शेख यांनी व्यक्त केली. दरम्यान निवडणुकीसाठीची संपूर्ण पूर्वतयारी करण्यात आली असून, या अनुषंगाने मतदारसंघात 20 पेक्षा अधिक बैठका घेऊन व्यापक सहमती मिळवण्यात आल्याचेही रशिद शेख यांनी सांगितले. यावेळी जमियत उलमाचे उपाध्यक्ष कारी इद्रीस, मौलाना काझमी , नॅशनल मॅनॉरिटी कॉन्फरन्सचे राहुल डंबाळे, रिजनल ख्रिश्चन सोसायटीचे लुकस केदारी, मुफ्ती शाहीद , जाहीद शेख व प्रमुख मौलाना व पदाधिकारी उपस्थित होते.