कितीही प्रगती केली तरी शिकण्याची भूक कायम असली पाहिजे : दिग्दर्शक सुभाष घई

पुणे : कितीही प्रगती केली तरी शिकण्याची भूक कायम असली पाहिजे कारण शिकणे बंद झाले तर प्रगती देखील संकुचित होऊन बसेल. कोणतीही गोष्ट शिका आणि ती गोष्ट अफलातून करा तरच यश मिळेल, असे प्रतिपादन मीडिया अँड एंटरटेनमेंट स्किल कौन्सिलचे (Media and Entertainment Skills Council) अध्यक्ष आणि चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते सुभाष घई यांनी केले. (No matter how much progress is made, the appetite for learning should remain: Director Subhash Ghai)

 

 

केंद्र सरकारच्या कौशल्य विकास आणि नव उद्योजकता मंत्रालयाच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय कौशल्य विकास स्पर्धेत पुणे येथील डिजाइन स्किल अकादमीच्या विद्यार्थ्यांनी विजेतेपद पटकाविले. या विद्यार्थ्यांचा गौरव घई यांच्या हस्ते करण्यात आला. (No matter how much progress is made, the appetite for learning should remain: Director Subhash Ghai)

 

यावेळी डॉ. आशिष कुलकर्णी (अध्यक्ष, एफआयसीसीआय एव्हीजीसी), मोहित सोनी (सीईओ, मीडिया अँड एंटरटेनमेंट स्किल कौन्सिल), डिझाइन स्कूल अकादमीचे संस्थापक सतीश नारायणन व संचालिका श्रीदेवी सतीश, जे. पी. श्रॉफ, राहुल बन्सी, संतोष रासकर आदी उपस्थित होते. (No matter how much progress is made, the appetite for learning should remain : Director Subhash Ghai)

 

इंडिया स्किल स्पर्धेत विजयी उमेदवार

 

3 डी डिजिटल गेम आर्ट

पंकज सिंग – सुवर्ण पदक

 

ग्राफिक डिझाइन टेक्नोलजी

उत्सव सिंग – सुवर्ण पदक

स्टीव्हन हॉरीस – रौप्य पदक

वाघिशा जैन – कांस्य पदक

 

ग्राफिक डिझाइन टेक्नोलॉजी (19 वर्षांखालील)

किमया घोमण – कांस्य पदक

Local ad 1