पुणे : कात्रज (Katraj) परिसरात गोवा बनावटी दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या (Excise Department) पथकाला मिळाली होती. त्यानुसार लावलेल्या सापडण्यात दारूची वाहतूक करणारा जाळ्यात अडकला. अटक आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार भिलारेवाडी परिसरात छापेमारी करण्यात आली, त्यातही गोवा बनवण्याचा मध्य साठा जप्त करण्यात आला. (Goods worth nine lakhs including Goa-made liquor seized)
उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 2 ऑक्टोंबर रोजी कात्रज परिसरातील अजित हॉटेल समोर गोवा बनवण्याच्या दारूची वाहतूक होत होती, सी विभागाच्या कारवाईमध्ये गोवा राज्य निर्मीत व विक्रीस असलेल्या विदेशी मद्य व चोरटी वाहतूक करणाऱ्या निशान कंपनीची सनी चारचाकी कार क्र.MH-१४-CX-२६४६ वाहनामधून एकूण ३ लाख २२ हजार ७३५रूपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीला न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. (Goods worth nine lakhs including Goa-made liquor seized)
दरम्यान आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार पुणे-सातारा रोडवर कात्रज घाटाजवळ भिलारेवाडी येथे गोवा राज्य निर्मीत व विक्रीस असलेल्या विदेशी मद्य व चोरटी वाहतूक करण्यासाठी वापरलेली महिन्द्रा कंपनीची पिकअप बोलेरो चारचाकी कार क्र. MH ११ CH-००७६ वाहनामधून एकुण ५६५५२०/- रूपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व आरोपीस न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. सदर गुन्हयामध्ये आतापर्यंत गोवा राज्य निमत् व विक्रीस असलेले विदेशी मद्य, दोन वाहन, दोन मोबाईल असा एकूण ८ लाख ८८ हजार २५५ रुपये किमतीचा मुद्देमाल दोन आरोपींच्या ताब्यातून वाहतूक करत असताना जप्त करण्यात आला आहे. (Goods worth nine lakhs including Goa-made liquor seized)
सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक सुनिल चव्हाण, पुणे उपयुक्त अनिल चासकर राज उत्पादन शुल्क अधीक्षक चरण सिंग राजपूत, उप अधीक्षक संजय पाटील युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक आर. पी. शेवाळे, सी. एस. रासकर एम.डी.लोंढे, दुय्यम निरीक्षक एस.एस. लोहाकरे, जवान व्ही. एस. परते, यु. एस. भाबड यांनी केली.