Night Curfew : रात्रीची संचारबंदी !  काय आहे नवी नियमावली ; जाणून घ्या एका क्लिकवर

मुंबई : राज्यात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत असून, दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची (Corona patients) संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवी नियमावली (Corona Guidelines) जाहीर केली आहे. त्या नियमावलीनुसार आता राज्यात 10 जानेवारीपासून रात्रीची संचारबंदी (Night Curfew) लागू असणार आहे. (Night curfew! What is the new regulations; Learn in one click)

 

सरकारी नोकरदारांसाठी नियमावली

  • लेखी आणि स्पष्ट परवानगीशिवाय सरकारी कार्यालयात लोकांना प्रवेश नाही

  • व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची सुविधा उपलब्ध करुन नागरिकांशी संवाद राखणे

  • एकाच कॅम्पसमधील किंवा बाहेरुन आलेल्यांसाठी व्हिडीओ कॉन्फरिन्सिंगद्वारे संवाद

  • कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा उपलब्ध करुन देणं, तसंच कार्यालयाच्या सोयीनुसार त्यांच्या कामाच्या तासात बदल करणे

  • सरकारी कार्यालयांमध्ये कोरोना नियमांचे तंतोतंत पालन व्हावे

  • थर्मल स्कॅनर, सॅनिटायझर उपलब्ध करुन देणे

  • Night curfew! What is the new regulations; Learn in one click

 

 

 

खासगी कार्यालयांसाठी नियमावली..

राज्यात सकाळी जमावबंदी, तर रात्री 11 ते पहाटे पाच पर्यंत रात्रीची संचारबंदी लागू, खासगी कार्यालये खासगी कार्यालयात 50 टक्के उपस्थितीची मर्यादा, कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या कर्मचाऱ्यांनाच प्रवेश, लस घेतले नसलेल्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करुन घ्यावे. कर्मचाऱ्यांकडून कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे याची काळजी घ्यावी. थर्मल स्कॅनर, सॅनिटायझर उपलब्ध करुन द्यावे. (Night curfew! What is the new regulations; Learn in one click)

 

असे आहेत नियम…

अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त 20 लोकांची उपस्थिती. सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रमांसाठी जास्तीत जास्त 50 लोकांची उपस्थिती. शाळा, महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद. मात्र 10 वी, 12वीचे वर्ग सुरु राहणार. तसंच शाळेतील प्रशासकीय कामे सुरु राहणार. स्विमिंग पूल, जीम, स्पा, वेलनेस सेंटर्स आणि ब्यूटी सलून बंद राहणार. हेअर कटिंग सलून 50 टक्के उपस्थितीत सुरु राहणार, सलूनमध्ये कोरोना नियमांचे काटेकोर पालन आणि कामगारांना लसीचे दोन्ही डोस बंधनकारक, रात्री 10 पर्यंतच परवानगी. मनोरंजन पार्क, प्राणी संग्रहालय, म्युझियम बंद राहणार. शॉपिंग मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स 50 टक्के क्षमतेनं सुरु राहणार . चित्रपटगृहे, नाट्यगृह 50 टक्के क्षमतेनं सुरु राहणार. तारीख जाहीर झालेल्या सर्व परीक्षा होणार, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

 

Local ad 1