Pune Crime | अमंलीपदार्थाची विक्री करणारा नायजेरियन गजाअड ; लष्कर पोलिसांची कारवाई

Pune Crime | पुणे : कॅम्प परिसरात लष्कर पोलिस (Army police) रात्रीच्या वेळी गस्तीवर असताना   नायजेरियन नागरीक संशयित रित्या फिरताना आढळून आला. त्याला पोलिसांनी हटकले असता, तो घाबरला पाळून जाण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी त्याला थांबवून पोलिसांनी अधिक चौकशी केली. त्यावेळी तो उडवा-उडवीचे उत्तरे देऊन सूटका करुन घेण्याचा प्रयत्न करत होता. परंतु पोलिसांना संशय आल्याने त्याची अधिक चौकशी केली. त्यात  तो अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आल्याची माहिती समोर आली. (Nigerian drug dealer arrested; Army police action)

 

चिकवु जेकवु रेऊबेन (CHUKWU JEKWU REUBEN) (वय-३६ वर्षे, रा. मुळ रा. मकुरडी, नायजेरीया सध्या रा. नालासोपारा जि. ठाणे व मोहम्मद मुसावी महामुद मुसावी (वय ३८ वर्षे, रा.९५१ न्यु नाना पेठ, पदमजी पार्क, पुणे), असे अटक केलेल्या संशयितांचे नाव आहे. (Nigerian drug dealer arrested ; Army police action)

लष्कर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  पोलिस (police)  मध्यरात्री गस्त घालत असताना पोलिसांनी ही कारवाई केली आहे. कारवाईत 15 लाख 29 हजाराचे कोकेन केले जप्त केले आहे. मुंबईमधून पुण्यात कोकोनची विक्री करण्यासाठी आल्याची माहिती त्याने दिली आहे. (Nigerian drug dealer arrested; Army police action)

 ही कामगीरी अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे (Additional Commissioner of Police Rajendra Dahale), पोलीस उप आयुक्त प्रियांका नारनवरे (Deputy Commissioner of Police Priyanka Naranware), पोलीस उप आयुक्त सागर पाटील (Deputy Commissioner of Police Sagar Patil), सहा. पोलीस आयुक्त यशवंत गवारी ९Assistant Commissioner of Police Yashwant Gawri) यांच्या मार्गदर्शनात आणि लष्कर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम (Ashok Kadam, Senior Inspector of Police, Lashkar Police Station) यांचे नेतृत्वाखाली पोलीस उप निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उप निरीक्षक निलेशकुमार महाडीक, पोहवा मनसुब शेख, पोहवा हिंदुराव शिंदे, पोहवा कैलास चव्हाण, पोना तेजस जगदाळे, मपोना विजया वेदपाठक, मपोना मनिषा तळेकर पोशि सलमान शेख, पोशि सागर हुवाळे, पोशि नानासाहेब घाडगे, पोशि आबासाहेब धावडे, पोशि नरळे, पोशि पवन भोसले, पोशि चक्रधर शिरगीरे, पोशि संभाजी दराडे यांनी केली आहे. गुन्हयाचा तपास सहा पोलीस निरीक्षक शितलकुमार गायकवाड हे करत आहेत.

Local ad 1