पुण्यात नव वर्षाच्या स्वागताची पार्टी चालणार ‘फुल नाईट’ ; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली परवानगी

पुणे : पुण्यामध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी मद्यप्रेमींना रात्री एक पर्यंत मद्य खरेदी तर पहाटे पाच पर्यंत पार्टी करता येणार आहे. पार्टी ‘फुल नाईट’ (New Year’s Party ) करता येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पहाटे पाच पर्यंत रेस्टॉरंट, बार सुरू ठेवण्यास परवानगी चे आदेश दिले आहेत. तर वाईन शॉप आणि बिअर शाॅपीमधून (Wine shop, beer shop) मद्यविक्रीसाठी रात्री एक वाजेपर्यंत जिल्हा प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. (New Year’s Party Can Be Held ‘ full Night’)