New voters register। नव मतदारांनो मतदार यादीत नाव नोंदवा अन् विधानसभेसाठी मतदान करा

New voters register । पुणे : विधानसभा निवडणुकीमध्ये वापरली जाणारी मतदार यादी अंतिम झाली आहे. मात्र. ज्यांची नावे नोंदविण्याची राहिले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) मतदान करण्यापासून वंचित राहण्याची भिती असेल तर ही बातमी आपल्यासाठी आहे. कारण आज मतदार नोंदणी केल्यास विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याची संधी मिळेला. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांनी येत्या शनिवार दि. 19 ऑक्टोबरपर्यंत अर्ज क्र. 6 भरुन नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे (collector dr. suhas diwase pune) यांनी केले आहे. (New voters register in the electoral roll and vote for the assembly)

 

Pune ACB News । पुणे झोपडपट्टी पुनवर्सनचे तत्कालीन उपमुख्य कार्यकारी शिरीष यादववर अपसंपदा प्रकरणी एसीबीने केला गुन्हा दाखल

निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशपत्र दाखल करण्याचा अंतिम दिनांक 29 ऑक्टोबर असून त्यापूर्वी 10 दिवसांपर्यंत म्हणजेच 19 ऑक्टोबरपर्यंत मतदार नोंदणी करता येते. त्यासाठी मतदारांनी आपले नाव यादीत आहे किंवा नाही याची खात्री  https://electoralsearch.eci.gov.in या संकेतस्थळावर करावी. मतदार यादीत नाव नसल्यास अर्ज क्र. 6 भरुन संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे 19 ऑक्टोबरपूर्वी सादर करावा, असेही डॉ. दिवसे यांनी कळविले आहे.
Local ad 1