...

आरोग्य विभाग भरती : आमिषाला बळी पडू नका

पुणे MH Times News : आरोग्य विभागातील गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील 6 हजार 185 पदांसाठी येत्या 25 आणि 26 सप्टेंबर रोजी परीक्षा होणार आहे.ही पदभरती पारदर्शक पध्दतीने होत आहे, जर कुणी वशिल्याने नोकरी लावण्याचे आमिष दाखवत असेल तर त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, असा सावधगिरीचा इशारा आरोग्यमंत्र्यांनी दिला आहे. (New update regarding written examination in health department)

 

 

आरोग्य विभागात होणारी गट क आणि ड वर्गातील एकूण 6 हजार 185 पदांसाठी 25 सप्टेंबरला गट क आणि 26 सप्टेंबरला गट ड संवर्गाची परीक्षा होणार आहे. परीक्षेचे चोख नियोजन करण्यासाठी राज्य आरोग्य विभागाने कंपनीला सूचना दिल्या आहेत. (New update regarding written examination in health department)

 

‘क’ आणि ‘ड’ गटासाठी राज्यातून तब्बल आठ लाख 66 हजार 660 विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. (Eight and a half lakh students applied for group C and D in the health department) त्यात ‘क’ संवर्गासाठी एकूण 4 लाख 5 हजार 163 व गट ‘ड’ संवर्गाचे 4 लाख 61 हजार 497 असे एकूण 8 लाख 66 हजार 660 उमेदवारांनी अर्ज केला आहे. (New update regarding written examination in health department)

 

 

परीक्षा घेणाऱ्या कंपनीत कामाला असून, तुमचं काम करून देतो, असे आमिष दाखवलं जात असल्याचा प्रकार जालना जिल्ह्यात घडल्याची चर्चा मात्र जोरात आहे. (New update regarding written examination in health department)

Local ad 1