पुणे Update news : आरोग्य विभागातील गट क व ड संवर्गाच्या लेखी परीक्षा 25 सप्टेंबर रोजी गट क संवर्गासाठी दोन सत्रात तर ड गटासाठी 26 सप्टेंबर रोजी एका सत्रामध्ये होणार आहे. आतापर्यंत तुम्हांला परीक्षा प्रवेशपत्र मिळालं नसेल तर नोंदणी केलेला मेल चेक करा, कारण अनेक उमेदवारांना मेल आला असून, त्यात काही सूचना केल्या आहेत. त्याची उमेदवारांना पूर्तता करायची आहे. (New update regarding written examination in health department)
क आणि ड गटासाठी राज्यातून तब्बल आठ लाख 66 हजार 660 विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. (Eight and a half lakh students applied for group C and D in the health department) अर्ज भरतानाच अनेक उमेदवारांनी सूचनांचे पालन केले नाही, त्यामुळे प्रवेशपत्र तयार होण्यास विलंब होत आहे. ज्यांनी आपला फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करताना सूचना पाळल्या गेल्या नाहीत. अशा उमेदवारांना आरोग्य विभागाने मेल केले आहे. ज्यांना मेल आला आहे, त्या उमेदवारांनी 24 तासांच्या आत दुरुस्ती करून घ्यावे, अशा सूचना केल्या आहेत. ज्यांना मेल आला नाही, त्यांनी घाबरण्याचे काही कारण नाही. (New update regarding written examination in health department)
राज्यातून आरोग्य विभागातील पदांसाठी उमेदवारांनी प्रतिसाद दिला आहे. त्यानुसार लेखी परिक्षेकरिता गट – क संवर्गाचे एकूण 4 लाख 5 हजार 163 व गट ड संवर्गाचे 4 लाख 61 हजार 497 असे एकूण 8 लाख 66 हजार 660 उमेदवर परिक्षेस बसणार आहेत. त्यामुळे उमेदवारांसाठी प्रचंड स्पर्धा असणार आहे. (New update regarding written examination in health department)