JN1 variant पुणे : देशात कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटचे रुग्ण साडपत असतानाच आता पुण्यात नव्या व्हेरीयंटने (Pune JN1 Covid) शिरकाव केला आहे. व्हेरीयंट JN1 चे तीन रुग्ण आढळल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने (State Department of Health) दिली. पुण्यात आढळेल्या एक रुग्ण अमेरिकेहून परतल्याची माहिती समोर आली. (Patients of new JN1 variant of Corona were found in Pune)
करोना विषाणूचा नवीन उपप्रकार JN1 चा (A new subtype of corona virus JN1) राज्यातील पहिला रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळला होता. त्यानंतर राज्यात रविवारी JN1 च्या आणखी नऊ रुग्णांचे अहवाल सकारात्मक आली आहेत. त्यात ठाणे महापालिका हद्दीत पाच, पुणे महापालिका हद्दीत दोन, पुणे जिल्हा आणि अकोला महापालिका हद्दीत प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. (Patients of new JN1 variant of Corona were found in Pune)
राज्यात सापडलेल्या JN1 च्या नऊ रुग्ण आढळले आहेत त्यातील आठ रुग्णांनी कोरोना प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. हे सर्व रुग्ण विलगिकरणात आहेत. सगळ्यांमध्ये JN1 व्हेरियंटचे तीव्र लक्षणे नसून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
नवीन JN1 व्हेरियंट कोविड 19 विषाणूच्या ओमायक्रोन व्हेरियंटचा सब – व्हेरियंट आहे. JN1 व्हेरियंटचा (A sub-variant JN1 of the omicron variant) पहिला रुग्ण 25 ऑगस्ट 2023 रोजी आढळला होता. दरम्यान, देशाच्या इतर भागांमध्ये अद्याप या व्हेरियंटचा रुग्ण सापडलेला नाही, पण कोरोनाबाधितांची संख्या मात्र वाढली आहे.