...

आत्मनिर्भरतेला जीवनमूल्यांची जोड देण्याची आवश्यकता: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

पुणे (MH टाईम्स) : नवीन शैक्षणिक धोरणात अनेक नावीन्यपूर्ण तरतुदी आहेत. मातृभाषेतून शिक्षण, सैद्धांतिक मूल्यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. आज देशात आत्मनिर्भरतेचे वातावरण आहे. या आत्मनिर्भरतेला जीवनमूल्यांची जोड देण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( maharashtra governor bhagat singh koshyari) यांनी केले.

बावधन (पुणे) येथील कॅम्पसमध्ये सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या (suryadatta education foundation) 23 व्या स्थापना दिवसानिमित्ताने ’सूर्यदत्ता जीवनगौरव पुरस्कार’ व ’सूर्यदत्ता राष्ट्रीय पुरस्कार’ राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते देऊन
विविध क्षेत्रातील मान्यवरांना गौरविण्यात आले. यावेळी नालंदा विद्यापीठाचे कुलपती, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर ( vijay bhatkar), अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक अध्यक्ष आचार्य डॉ.लोकेश मुनिजी, भजन गायक अनूप जलोटा, ज्येष्ठ अभिनेते रजा मुराद, सूर्यदत्ता’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया ( Professor Dr. Sanjay B. Chordiya), उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया, सिद्धांत चोरडिया आदी उपस्थित होते.

Great things in business are never done by one person. They are done by a team of people.

राज्यपाल कोश्यारी (maharashtra governor bhagat singh koshyari) म्हणाले, कोणत्याही कामात समर्पण, कठोर मेहनत हवी. उद्योजकतेची अनेक क्षेत्रे आज खुणावत आहेत. त्या संधींचा आपण उपयोग केला पाहिजे. आपल्या कामात प्रामाणिकता, पारदर्शकता हवी. ग्रामीण भागातील अनेक मुले आयएएस, आयपीएस झाली आहेत. त्यामुळे मातृभाषेचा आग्रह धरावा, असे त्यांनी सांगितले.

Local ad 1