राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या कारला अपघात
मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर रसायनी जवळ एसटी आणि कारचा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात अहमदनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप थोडक्यात बचावले आहे. आमदार जगताप यांच्या कारचा चक्काचूर झाला असून, पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. (NCP MLA Sangram Jagtap’s car crashed)
मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर बीएमडब्ल्यू कार आणि एसटी बसचा अपघात झाला. हा अपघात रसायनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाला आहे. या अपघातात कुणीही जखमी झालेलं नाही, असे सांगण्यात येत आहे. तसेच आमदार जगताप यांना मुंबईला घेऊन जाण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. (NCP MLA Sangram Jagtap’s car crashed)