Assembly Election 2024 । कोथरुड विधानसभा मतदार संघावर राष्ट्रवादी काँग्रेसने केला दावा ; उच्च तंत्री शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अडचणी वाढल्या !
Assembly Election 2024। पुणे.कोथरुड विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा राज्याचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Higher Technical Education Minister Chandrakant Patil’s problems increased!) यांना भाजपमधून विरोध होत आहे. त्यानंतर आता महायुतिमध्ये असलेल्या राष्ट्रवादी कॉग्रेसनेही कोथरुड विधानसभा मतदार संघावर दावा केला आहे. तसेच कोथरुडला स्थानिकआणि हक्काचा आमदरा हवा, पाहिजे त्या प्रमाणात विकास झालेला नाही, असा आरोप करत राष्ट्रवादी कॉग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रतिनिधी विजयी डाकले (State representative of Congress Party, Vijay Dakle) यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या अडचणी कमी होण्या ऐवजी वाढत असल्याचे दिसून येत आहे. कारण चंद्रकांत पाटील यांना पक्षातंर्गत विरोधाचा सामना करावा लागत आहे. (NCP claimed Kothrud Assembly Constituency)
डाकले म्हणाले, कोथरूडमध्ये गेल्या काहीं वर्षात विकास कामे रखडली असून, यापूर्वी कोथरूडच्या निवडणुका विचारांच्या आणि विकासाच्या मुद्द्यावर होत होत्या. मात्र,काही नेत्यांनी आता यात्रा, जत्रा आणि ‘वाटप’ संस्कृतीचा चुकीच्या पायंडा पाडला आहे, हे कोथरुडकर म्हणून क्लेश दायक आहे. कोथरुडचाखरा विकास अजून मागेच राहिला आहे, असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसपार्टीचे प्रदेश प्रतिनिधी विजय डाकलेयांनी आज कोथरुड मधून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. मागील दोन विधानसभा निवडणुकीवेळी चांगल्या प्रकारे तयारी करूनही पक्षाचा आदेश मानून मी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली होती.
कोथरूडमध्ये शिवसृष्टी, रस्ते, कचरा, ड्रेनेज, वाहतूकीसह अनेक प्रश्न तसेच आहेत. कोथरूडकरांना जात धर्म पंथ यातील राजकारणात रस नसून कोथरूडचा विकास चांगल्या प्रकारे झाला पाहिजे, अशी सर्वसामान्य कोथरूड कारांची भावना आहे. गेल्या दहा वर्षात कोथरूडमध्येमोठ्या प्रमाणात नागरी आणि मूलभूत समस्यांची वारंवार निर्माण झाली असून, कोथरुडचे सध्याचे राजकारण पाहता मोठ्या प्रमाणात यात्रा, जत्रा आणि वाटप करण्याची वेळ इच्छुक उमेदवारांना आली आहे, असा आरोपडाकले यांनी केला आहे.
कोथरूड मतदार संघाची जागा राष्ट्रवादी पक्षाने लढवली पाहिजे व याठिकाणी मला उमेदवारी मिळावी याकरिता आम्ही पक्षाचे वरिष्ठ नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर (Ajit Pawar, Sunil Tatkare, Rupali Chakankar) आणि शहराच्या स्थानिक नेतृत्वाला कार्यकर्त्यांच्या भावना कळविल्या आहेत. त्यामुळे कोथरूड मतदार संघात महायुतीनेआपल्याला उमेदवारी द्यावी, अशी पेक्षा आहे. उमेदवारी न मिळाल्यास निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याचे डाकले यांनी सांगितले आहे. त्यामुळे अमोल बालवडकरांच्या भुमिकेने अडचणीत असलेल्या चंद्रकांत पाटील यांची विजय डाकले यांच्या भुमिकेमुळे अडचणी वाढण्याची शक्यता आहे.