राष्ट्रवादी काँग्रेसने 38 उमेदवारांची यादी जाहीर ; अजित पवार बरमातीमधूनच विधानसभा लढवणार 

 

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने आपल्या 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात अजित पवार बारामती विधानसभा मतदासंघातून निवडणूक लढवणार आहेत. जाहीर. करण्यात आलेल्या यादीमध्ये अजित पवार (Ajit Pawar will contest assembly from Barmati) यांचे नाव पहिल्या क्रमंकावर आहे. (NCP announced list of 38 candidates)

 

 

 

विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. मंगळवार पासून (२२ ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवातही झाली आहे. त्यामुळे आता राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर होत आहेत. बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या ३८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

 

शिवसेनेने जाहीर केलेले 45 उमेदवार कोण आहेत?

 

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या ३८ उमेदवारांच्या यादीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामती विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे ते आता बारामतीमधून विधानसभा लढवणार हे स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी आपल्याला बारामतीमधून निवडणूक लढवण्यास रस नसल्याचं विधान केलं होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.

 

 

 

बारामती विधानसभा मतदारसंघामधून अजित पवार, आंबेगाव विधानसभा मतदारसंघामधून दिलीप वळसे पाटील, येवला मतदारसंघामधून छगन भुजबळ श्रीवर्धनमधून अदिती तटकरे, मावळमधून सुनील शेळके, अहिल्यानगरमधून (अहमदनगर) संग्राम जगताप, परळीमधून धनंजय मुंडे यांच्या नावाचा समावेश आहे.

 

 

मंत्री आणि विद्यमान आमदारांना संधी

बारामती अजित पवार, येवला छगन भुजबळ, आंबेगाव दिलीप वळसे पाटील, कागल हसन मुश्रीफ, परळी धनंजय मुंडे, दिंडोरी नरहरी झिरवाळ, अहेरी धर्मरावबाबा आत्राम, श्रीवर्धन – आदिती तटकरे, अंमळनेर अनिल पाटील, उदगीर संजय बनसोडे, अर्जुनी मोरगाव राजकुमार बडोले, माजलगाव प्रकाश दादा सोळंके, वाई मकरंद पाटील, सिन्नर माणिकराव कोकाटे, खेड आळंदी दिलीप मोहिते, अहमदनगर शहर संग्राम जगताप, इंदापूर दत्तात्रय भरणे, अहमदपूर बाबासाहेब पाटील, शहापूर दौलत दरोडा, पिंपरी अण्णा बनसोडे, कळवण नितीन पवार, कोपरगाव आशुतोष काळे, अकोले किरण लहामटे, वसमत चंद्रकांत नवघरे, चिपळूण शेखर निकम, मावळ सुनील शेळके, जुन्नर अतुले बेनके, मोहोळ यशवंत विठ्ठल माने, हडपसर चेतन तुपे, देवळाली सरोज अहिरे, चंदगड राजेश पाटील, इगतपुरी हिरामण खोसकर, तुमसर राजू कारेमोरे, पुसद – इंद्रनील नाईक, अमरावती शहर सुलभा खोडके, नवापूर भरत गावित, पाथरी निर्माला उत्तमराव विटेकर, मुंब्रा कळवा नजीब मुल्ला यांच्या नावाचा समावेश आहे.

 

 

 

 

Local ad 1