...

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक

मुंबई : 50 खोके एकदम ओके या विरोधकांच्या टिकीवर बोलताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची जीभ घसरली. राष्ट्रवादीचेे खासदार सुप्रिया सुळे यांच्या विषयी बोलताना असंसदीय शब्दांचा वापर केला. त्यानंतर राज्यभरात अब्दुल सत्तार यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, राज्यातील प्रमुख शहरांमध्ये आंदोलन केली जात आहेत. (NCP activists aggressive after Agriculture Minister Abdul Sattar’s statement)

 

 

दरम्यान राज्यात राष्ट्रवादीच्या महिला आक्रमण झाले असतानाच अब्दुल सत्तार यांचा माफीनामा समोर आला आहे. “मी कोणत्याही महिला भगिनींच्या बाबतीत अपशब्द बोललो नाही. आम्हाला जे बदनाम करत आहेत, त्यांच्याबद्दल बोललो आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिय सुळे (Supriya Sule ) यांच्याबद्दल किंवा कोणत्याच महिलेबद्दल मी काहीच बोललो नाही. महिलांची मने दुखावतील असा कोणताच शब्द बोललो नाही. परंतु, माझ्या बोलण्याने जर कोणाची मने दुखावली असतील  तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो आणि माझा शब्द मागे घेतो, सॉरी म्हणतो असे म्हणत अब्दुल सत्तार (Abdul Sattar ) यांनी महिला वर्गाची माफी मागितली आहे.

 

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका केली आहे. सत्तार यांच्या गलिच्छ भाषेतील टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. राज्यभर राष्ट्रवादीकडून सत्तारांविरोधात निदर्शने केली जात आहेत. त्यामुळे वाढता विरोध पाहून अखेर सत्तारांनी आपले शब्द मागे घेतो असे म्हटले आहे.  (NCP activists aggressive after Agriculture Minister Abdul Sattar’s statement)

 

मी जे बोललो ते फक्त खोक्यांच्याबद्दल बोललो. परंतु, त्याचा कोणी वेगळा अर्थ काढू नये. मी महिलांचा सन्मान करणारा नेता आहे. मी कोणत्याही महिलेच्या विरोधात बोललो नाही, असं अब्दुल सत्तार यांनी यावेळी म्हटले. परंतु, माफी मागत असताना सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांचं नाव घेण्याचं टाळलं आहे. (NCP activists aggressive after Agriculture Minister Abdul Sattar’s statement)
Local ad 1