नांदेड जिल्ह्यात NCB ची धमाकेदार कामगिरी ; तब्बल 11 कोटींचा गांजा जप्त

नांदेड : राज्यासह देशात ड्रग्ज प्रकरण चर्चेत असतानाच मुंबई NCB च्या पथकाने नांदेड जिल्ह्यातील मांजरम (ता.नायगगांव) येथे सोमवारी पहाटे धडाकेबाज कामगिरी केली आहे. एका ट्रकमधून तब्बल 11 कोटी रुपयांचा गांजा पकडला आहे. (NCB seizes Rs 11 crore worth of cannabis) 

 

 

मुंबई एन सी बीच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आंध्रप्रदेशातून महाराष्ट्रात गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार देगलूर येथे तीन दिवसांपासून सापळा लावण्यात आला होता. सोमवारी पहाटे एका संशयित ट्रकचा पाठलाग करत हा ट्रक गडगा ते कहाळा मार्गे नांदेड आणि त्यापुढे जळगांव येथे जात होता. दरम्यान, सोमवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास मांजरम येथे ट्रकला थांबून झडती घेतली असता. त्यात अंदाजीत ११ कोटीचा ११२७ किलो गांजा मिळून आला. गांजा व ट्रस्ट जप्त करण्यात आला असून चालकासह अन्य एकाला ताब्यात घेवून कसून चौकशी करण्यात येत आहे. दोन दिवसात या प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक करण्यात येईल, अशी माहिती अधिकारी यांनी दिली. (NCB seizes Rs 11 crore worth of cannabis)

 

ही धमाकेदार कारवाई पथकातील पोलीस अधिकारी अमोल मोरे, सुधाकर शिंदे, संजय गवळी, प्रमोद मोरे, कृष्णा पारमदरेकर यांनी केली.

 

मार्ग बदलला तरी पथकाने गाठलेच 

एन.सी.बी चे पथक आपल्या मागावर असल्याची कुणकुण ड्रग माफीयांनाही लागली होती. त्यामुळे गांजा तस्करांनी पथकाला हुलकावणी देण्यासाठी नेहमीचा मार्ग बदलला होता. परंतु गेल्या तीन दिवसांपासून मागावर असलेल्या पथकाने गाठलेच. (NCB seizes Rs 11 crore worth of cannabis)

 

 

Local ad 1