...

Navi Mumbai Acb Trap। उरण पोलिस ठाण्यातील महिला पीएसआयला 50 हजारांची लाच घेताना अटक

Navi Mumbai Acb Trap । नवी मुबंई : वडिलांविरोधात दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी साठ हजार रुपयांची लाचेची (A bribe of sixty thousand rupees) मागणी करुन तडजोडीनंतर 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना ठाणे अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने महिला पोलिस उप निरक्षकाला अटक केली आहे. (PSI of Uran police station arrested red-handed while accepting bribe of 50 thousand)

 

 

 

सिंधु तुकाराम मुंडे (पोलीस उप निरीक्षक, उरण पोलीस ठाणे, नवी मुंबई) (Sindhu Tukaram Munde (Sub-Inspector of Police, Uran Police Station, Navi Mumbai) असे अटक केलल्या महिला पोलिस उप निरक्षकाचे नाव आहे.

 

 

 

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांच्या वडिलाविरोधात नवीन मुंबईमधील उरण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गुन्ह्याच्या तपासामध्ये मदत करण्यासाठी एसीबी ठाणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक सुनिल लोखंडे आणि अप्पर पोलीसअधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस उप अधीक्षक अश्विनी पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 

लाचेची मागणी झाल्यास संपर्क साधा

ठाणे जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा. अँन्टी करप्शन ब्युरो, ठाणे दुरध्वनी 022-27833344 @ टोल फ्रि क्रं. 1064

Local ad 1