माजी आमदार बापुसाहेब गोरठेकर यांची राष्ट्रवादीत (NCP) घरवापसी

नांदेड : लोकसभा निवडणुकीपुर्वी राष्ट्रवादीला Nationalist Congress Party (NCP) रामराम करुन भारतीय जनता पक्षाचे (Bharatiya janata party) कमळ हाती घेतलेले माजी आमदार बापुसाहेब गोरठेकर (Former MLA Bapusaheb Gorthekar) आता त्यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy chief minister ajit pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत घरवापसी केली आहे, अशी माहिती लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन (facebook page) दिली. 

 

माजी आमदार बापुसाहेब गोरठेकर यांच्याकडे राष्ट्रवादीचे (Nationalist Congress Party (NCP) जिल्हा अध्यक्षपद होते. त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपुर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे संघटनात्मक दृष्ट्या  राष्ट्रवादीला मोठा झटका बसला होता. त्याचा फयदा खासदार प्रताप पाटील चिखलीकर (MP pratap patil chikhalikar) यांना निवडणुकीत झाला. दरम्यान, काही दिवसापुर्वी लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता गोरठेकर यांची घरवापसी झाल्याने नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनात्मक सक्षम होत असल्याचे चित्र निर्माण होत आहे.

Local ad 1