National record । पुण्याच्या शीतल महाजनचा राष्ट्रीय विक्रम ; पॅरामाेटर मधून सहा हजार फुटांवरुन पॅराजंम्प
National record । पुणे : स्वातंत्र्यांचे अमृत महाेत्सवी वर्ष आणि प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने पद्यश्री शीतल महाजन (राणे) हिने पुण्यातील हडपसर येथील ग्लायडिंग सेंटर येथे पॅरामाेटरच्या सहाय्याने पाच हजार फुटांवरुन नऊवारी साडी घालून पॅराजंम्पिंग केले आहे . अशाप्रकारे पॅरामाेटार मधून नऊवारी साडी घालत पॅराजंम्प करणारी ती पहिलीच भारतीय महिला असून हा तिचा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित झाला आहे. (National record of Sheetal Mahajan of Pune; Parajump from six thousand feet above the parameter)
शीतल महाजन म्हणाली, सर्वसामान्य कुटुंबातून स्कायडायव्हिंग खेळात (पॅराशूट जंम्पिंग) पुढे येत आंतरराष्ट्रीय स्तरावरील वेगवेगळया स्पर्धेत मी सहभागी झालेली आहे .आतापर्यंत माझ्या नावावर १८ राष्ट्रीय आणि सहा जागतिक विक्रम प्रस्थापित आहेत . (National record of Sheetal Mahajan of Pune; Parajump from six thousand feet above the parameter)
केंद्र सरकारतर्फे २०११ मध्ये मला पद्यश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. जगातील सात खंडात स्कायडायव्हिंग करणारी मी पहिली भारतीय महिला आहे. याची दखल घेत फेडरेशन ऑफ एराेनाॅटिकल इंटरनॅशनल यांनी माझा सबिहा गाेकसेन सुवर्ण पदक देऊन सन्मान केला आहे . (National record of Sheetal Mahajan of Pune; Parajump from six thousand feet above the parameter)
आतापर्यंत साडी घालून मी भारताबाहेर अनेक ठिकाणी स्कायडायव्हिंग केले परंतु प्रथमच भारत देशात माझी कर्मभूमी आणि जन्मभूमी असलेल्या पुणे शहरात नऊवारी साडी घालून पॅरामाेटार मधून पॅराजम्पिंग केल्याने ही विशेष पॅराजम्पं माझ्यासाठी अविस्मरणीय ठरली आहे. (National record of Sheetal Mahajan of Pune; Parajump from six thousand feet above the parameter)
पॅरामाेटरचे पायलट रॉन मेनेज हे एक पॅरामाेटर इन्सट्रक्टर आहेत यांच्या पॅरामाेटारमधून आम्ही जमीनीपासून आकाशात पाच हजार फुटांवर गेलो . त्याठिकाणी पॅरामाेटार मधून मी बाहेर पडत आकाशात पक्ष्यासारखी झेप घेतली. जमीनीच्या दिशेने मी वेगात येत असतानाच साडेतीन हजार फुट उंचीवर मी पॅराशूट उघडले. अशाप्रकारे पॅरामाेटार मधून पॅराशूट जंम्प करणारी मी पहिली भारतीय महिला ठरली आहे. या उपक्रमासाठी ग्लायडिंग सेंटर हडपसर पुणे चे अधिकारी शैलेश चारभे यांचे विशेष सहकार्य लाभले.