(National Highway 161A) नांदेड-बिदर राष्ट्रीय महामार्गावरील कौठा येथील अनेकांची घर जाणार पाण्यात
कंधार : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 अ (Nanded to Bidar New National Highway 161A)उस्मानगर- हळदा -कौठा -मुखेड -बिदर या मार्गावर कौठा येथे रस्त्याच्या दोन्ही बाजुने पाणी जाण्यासाठी नाली बांधकाम करण्यात आले नाही. त्यामुळे महामार्गालगत असलेल्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरण्याची शक्यता आहे. सध्या लाॅकडाऊनमुळे काम बंद असून, नाली बांंधकाम झाल्याशिवाय रस्त्याच्या कामाला सुरुवात करुन दिलेे जाणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितन गडकरी यांनी निवेदन सादर करण्यात आले आहे. (Nanded to Bidar New National Highway 161A)
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 अ उस्मानगर- हळदा -कौठा -मुखेड -बिदर या महामार्गाचे काम रुद्रायणी कंट्रकशन मार्फत केले जात आहे. मात्र, महामार्गावरील गावांत भविष्यात निर्माण होणाऱ्या समस्यांकडे दुलर्क्ष करण्यात आले आहे. कौठा गावाच्या मध्यभागातून हा महामार्ग जातो. याठिकाणी रस्त्त्याच्या कामापुर्वी दोन्ही बाजुने नाली बांधकाम होणे आवश्यक होते. मात्र, त्याकडे दुलर्क्ष करण्यात आले. सुरुवातीला कंपनीकडून नाली बाधकांम केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, आता उडवा उडवीचे उत्तर दिली जात आहेत. (Nanded to Bidar New National Highway 161A)
रस्त्याच्या दोन्ही बाजुला वस्ती असून, त्याठिकाणी नाली नसल्याने घरातील सांडपाणी जमा होत असून, त्यातून आजारांचा फैलाव होण्याची शक्यता आहे. तर पावसाळ्यात घरात पाणी शिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी नाली बांधकाम झाल्याशिवाय रस्त्याच्या कामाला सुरुवात करु दिली जाणार नाही, असा इशारा दिली आहे. (Nanded to Bidar New National Highway 161A)
आमची घरे ही सखल भागात असून, पुर्वी रस्ता अंरुद होता. त्यामुळे पावसाचे पाणी रस्ता पार करुन पुढे जात असे. आता रस्त्याची उंची वाढली त्यामुळे पाऊस झाल्यास पाणी जाण्यासाठी जागाच नाही. परिमाणी आमच्या घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे, असे स्थानिक नागरीक राहुल तेलंगे यांनी सांगितले.