National Haiway : गोळी लागल्यानंतरही ‘त्या’ने गाठले प्राथमिक आरोग्य केंद्र (nanded firing incident)

नांदेड : मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी ते वडगाव दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील निवळी शिवारात असलेल्या  गणपती मंदिराजवळ एका दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात व्यक्तीने तरुणावर गोळीबार (pistol firing) केला आहे. विशेष म्हणजे गोळी लागून जखमी झालेला तरुण स्वतः बाऱ्हाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाला. त्याच्यावर प्राथमिक उपचार करुन त्याला पुढील उपाचरासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले (Akola – nanded – bidar national Haiway 161; nanded firing incident )

Akola - nanded - bidar national Haiway 161; nanded firing incident

दरम्यान, अज्ञात व्यक्तीने त्याचा मोटारसायकलवरून सिनेस्टाईल पाठलाग केला. नेवळी शिवारातील गणपती मंदीराजवळ त्याच्यावर गोळीबार केला. त्यात तिरुपतीच्या पाठीमागुन उजव्या खांद्याखाली गोळी लागली. जखमी होऊनही तिरुपतीने थेट प्राथमिक रुग्णालय गाठले. प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी नांदेड येथिल शंकरराव चव्हाण जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. (Akola – nanded – bidar national Haiway 161, nanded firing incident )

तुरुपती पपुलवाड (वय-31 रा. नेवळी. ता. मुखेड) असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तिरुपती हा खाजगी कामानिमित्य मंगळवारी (दि.९ मार्च) रोजी सकाळी देगलुर तालुक्यातील करडखेल येथे गेला होता. त्याठिकाणावरुन आपले काम संपुन तो एम.एच.24.ए. पी.3149 या क्रमांकाच्या दुचाकीवरुन नेवळीला परत येत होता. (Akola – nanded – bidar national Haiway 161, nanded firing incident )

Local ad 1