(Nanded Z. P.CEO Varsha Thakur Corona Positive) नांदेड जिल्हा परिषदेच्या सीईओ वर्षा ठाकूर कोरोना पाॅझिॉटिव्ह
नांदेड : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना कोरोनाची बाधा झाली. त्या्ंच्या संपर्कात आलेल्या लोकांनी काळजी घ्यावी, वेळप्रसंगी कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे अहवान वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे. (Nanded Z. P. CEO Varsha Thakur Corona Positive)
गेल्या काही दिवसांत जिल्हा परिषदेच्या विविध बैठका, अर्थसंकल्प व इतर विषयांबाबत झालेल्या बैठका व सभा लक्षात घेता संपर्कात आलेल्या व्यक्तींनी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे. (Nanded Z. P. CEO Varsha Thakur Corona Positive)
“माझी प्रकृती ठिक असून मी अत्यावश्यक असलेले सर्व कामकाज ई-तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करीत आहे. मी गृहविलगीकरणाचा पर्याय निवडला असून, डॉक्टरांनी दिलेल्या सर्व निर्देशाचे पालन करीत असल्याचे वर्षा ठाकूर यांनी स्पष्ट केले. (Nanded Z. P. CEO Varsha Thakur Corona Positive)
कार्यालयीन कामकाजासंदर्भात कार्यालयात व परिसरात जे कोणी माझ्या कार्यालयात उपस्थित होते त्यांनी काळजी घ्यावी. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सर्वांनी काळजी घेण्याची आवश्यकता असून आवश्यकता जर नसेल तर जनतेने बाहेर जाणे टाळावे, असे ही अहवाहन वर्षा ठाकूर यांनी केले आहे. (Nanded Z. P. CEO Varsha Thakur Corona Positive)