Nanded Vidhan Sabha Election 2024 नांदेड जिल्ह्यात कोणत्या पक्षाचे किती आमदार ? जाणून घ्या
नांदेड लोकसभा मतदार संघची पोटनिवडणूक ही जाहीर
Nanded Vidhan Sabha Election 2024 । नांदेड : नांदेड जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदार संघ असून, त्यात काँग्रेसचे चार, भाजपचे तीन आणि शेकाप आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक आमदार विजयी झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसला खातेही उघडता आले नव्हते. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली उभी फुट आणि त्यानंतर झालेल्या पक्षांतरांमुळे उलटफेर झाले आलेत. मात्र, एकेकाळी नांदेड जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जात होता. परंतु अशोच चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने हा किल्ला ढासळतो की काय अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा काँग्रेसचे वसंत चव्हाण यांनी पराभव केला. त्यामुळे नांदेड काँग्रेसचा बालेकिल्ला शाबुत असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, आता विधानसभा निवडणुकीत काय होते, हे पहाणे महत्नाचे आहे. (Nanded Vidhan Sabha Election 2024 How many MLAs of which party?)
नांदेड जिल्ह्यात 9 विधानसभा मतदारसंघ आहेत. सुरुवातीच्या काळात हा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र, हळूहळू या जिल्ह्यात भाजपची ताकद वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी देखील लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राज्याचे वातावरण चांगलच तापल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर नांदेड जिल्ह्यात देखील राजकीय समीकरणे बदलली आहेत. आता विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षाच्या इच्छुकांनी तयारी सुरु केली आहे.
वंचित बहुजन आघाडीने उमेदवार केला जाहिर
2019 च्या विधानसा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने फारुख अहमद यांना नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली होती. त्यावेळी त्यांना 14.61 टक्के मते म्हणजेच 26 हजार 713 मते मिळाली होती. तर एमआयएमचे उमेदवार मोहम्मद साबेर चाऊस यांना 11.1 टक्के म्हणजे 20 हजार 1122 मते मिळाली होती. या मतदार संघात काँग्रेसचे मोहन हंबर्डे यांनी 25.68 टक्के म्हणजेच 46943 मते मिळवून विजयी झाले होते. विधानसभा निवडणुका जाहिर होण्यापुर्वीच वंचित बहुजन आघाडीने फारुख अहमद यांना उमेदावारी जाहिर केली आहे.
नांदेड जिल्ह्यातील आमदार (Nanded MLA List)
- किनवट विधानसभा – भीमराव केराम (भाजप)
- हदगाव विधानसभा – माधवराव पाटील जवळगावकर (काँग्रेस)
- भोकर विधानसभा – अशोक चव्हाण (भाजप) – सध्या राज्यसभा खासदार
- नांदेड विधानसभा – उत्तर बालाजी कल्याणकर (शिवसेना – एकनाथ शिंदे)
- नांदेड विधानसभा – दक्षिण मोहन हंबर्डे (काँग्रेस)
- लोहा विधानसभा – श्यामसुंदर शिंदे (शेकाप)
- नायगाव विधानसभा – राजेश पवार (भाजप)
- देगलूर विधानसभा – जितेश अंतापूरकर (काँग्रेस – सध्या भाजप)
- मुखेड विधानसभा – तुषार राठोड (भाजप)