(Nanded vaccination) नांदेड जिल्ह्यात 18 ते 44 गटातील नागरिकांनाही लस

नांदेड : कोरोना प्रतिबंधक लस पुरेश्या प्रमाणात उपलब्ध होत असल्याने दुसऱ्या डोससाठी 45 वर्षावरील वयोगटातील व्यक्तींनाच दिली जात होती. तर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लसीची प्रतिक्षाच होती. गुरुवारी (दि.3 मे) नांदेड जिल्ह्यात 94 लसीकरण केंद्रांवर लसीकरण होणार आहे. त्यात 18 ते 44 आणि 45 वर्षावरील नागरिकांना लस दिली जाणार आहे. (Nanded vaccination)

जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 94 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. कोव्हॅक्सीनची लस ही 18 ते 44 व दुसऱ्या डोससाठी 45 वर्षावरील वयोगटातील व्यक्तींना देण्यात येणार आहे. मनपा क्षेत्रातील 9 केंद्रावर लसीचे डोस उपलब्ध करुन दिले आहेत. (Nanded vaccination)

या केंद्रात श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, कौठा व सिडको या 8 केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस याठिकाणी 45 वर्षावरील व्यक्तींना दुसरा डोस प्राधान्याने दिला जाईल. तर डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व स्त्री रुग्णालय येथे दोन्ही गटातील व्यक्तींसाठी कोव्हॅक्सीनचे प्रत्येकी 30 डोस, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय व जंगमवाडी येथे प्रत्येकी 40 डोस तर हैदरबाग या केंद्रावर 90 डोस उपलब्ध आहेत. हे दोन्ही वयोगटातील म्हणजेच 18 ते 44 व 45 वर्षावरील व्यक्तींसाठी दुसरा डोससाठी वापरले जातील.

उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा, मुखेड, हदगाव, देगलूर, ग्रामीण रुग्णालय भोकर, बारड, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येक केंद्रनिहाय 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. हे डोस प्राधान्याने 45 वर्षावरील व्यक्तींसाठी दिले जातील. उपजिल्हा रुग्णालय हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, मांडवी, लोहा, माहूर, नायगाव, उमरी या 12 केंद्रावर कोव्हॅक्सीनचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन देण्यात आले असून हे डोस दोन्ही वयोगटातील व्यक्तींसाठी आहेत.

ग्रामीण रुग्णालय कंधार व मुदखेड या केंद्रावर कोव्हॅक्सीनचे अनुक्रमे 90 व 60 डोस उपलब्ध असून हे सुद्धा दोन्ही वयोगटातील व्यक्तींच्या दुसऱ्या डोसाठीच दिले जातील. जिल्ह्यात ग्रामीण भागातील सर्व 67 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध असून ही लस 45 वर्षावरील वयोगटातील व्यक्तींसाठी प्राधान्याने दिली जाईल. (Nanded vaccination)

Local ad 1