(Nanded ) नांदेडची वाटचाल अनलॉकच्या दिशने

नांदेड ः कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्याने नांदेडकरांना दिलासा मिळाला. आता सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत मॉल वगळता सर्व दुकाने उघडण्यास जिल्हाधिकारी डाॅ. विपिन इटनकर यांनी परवानगी दिली. त्यामुळे आता नांदेडची वाटचाल अनलॉकच्या दिशेने होत आहे. (Nanded unlock)

आजपासून सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरु ठेवता येणार आहेत. तर शनिवार आणि रविवारी बंद असणार आहेत. तर दुपारी तीन वाजल्यानंतर बंद ठेवावे लागणार आहेत. आत्यावश्यक नसलेल्या वस्तू ऑनलाईन मागवता येणार आहेत. नांदेडमध्ये आता कोरोनाचे रोज शंभर ते दीडशे रुग्ण आढळत आहेत. पॉझिटिव्ह रेट कमी झाला आहे. सध्या खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे खते, बियाणे विकाणारी कृषी दुकाने ही सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली.   (Nanded unlock)

nanded unlock

Local ad 1