नांदेड आरटीओ विभाग झाले मालामाल
नांदेड : नांदेड प्रादेशिक परिवहन विभागाने (Nanded Regional Transport Department) सन 2021-22 मध्ये महसूल वसुली व अंमलबजावणी कामकाजात महसूल वसुलीच्या 106 टक्के उद्दिष्ट पूर्ण करुन मालामाल झाले आहे. (Nanded RTO became a division of goods)
Related Posts
या विभागात नांदेड, परभणी, हिंगोली (Nanded, Parbhani, Hingoli) या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. महसूल वसुली कामात उद्दिष्ट 177 कोटी रुपये एवढे होते यात 188 कोटी रुपयाची पूर्तता करून 106 टक्के कामाचे उद्दीष्ट पूर्ण केले आहे. तर अंमलबजावणी कामकाजात 738 लाख रुपयाचे उद्दीष्ट देण्यात आले होते. यात 696 लाख रुपयाची उद्दीष्ट पूर्तता करून 94 टक्के हे काम पूर्ण केले आहे. (Nanded RTO became a division of goods)
नांदेड विभागाने एकुण 188 कोटी रुपयाची महसूल वसुली केली आहे. वाहन अंमलबजावणी (वाहन तपासणी) कामात 13 हजार 420 दोषी वाहनधारकांकडून 696 लाख रुपये इतका दंड वसूल केला आहे. आकर्षक नोंदणी क्रमांकाद्वारे नांदेड कार्यालयाने 2 हजार 184 वाहनांकडून 168 लाख रुपये इतका महसूल प्राप्त केला आहे.(Nanded RTO became a division of goods)