(Rain today) नांदेड जिल्ह्यात चार दिवस पाऊस अन् गारपीटीचे
नांदेड : मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्रांच्या वतीने 15 जूनपर्यंत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे पुढाल चार दिवस पाऊस आणि गारपीटीचे असणार आहेत. त्यामुळे नागरिकांना काळजी घ्यावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी केले आहे. nanded rain today
हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यामुळे विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना आहे. त्यामुळे बाहेर जाणे टाळावे, जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा, असे आवाहन करण्यात आले. nanded rain today