...

मराठवाड्यासाठी गुड न्यूज ; नांदेड-पुणे एक्सप्रेस आधुनिक कोचसह दररोज धावणार

परभणी : मनमाडमार्गे आठवड्यातून दोनदा धावणार्‍या नांदेड-हडपसर सुपरफास्ट रेल्वेचा विस्तार पुणे पर्यंत करून ती आधुनिक एल हेच बी कोच सह दररोज धावणार आहे, अशी माहिती माहिती केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी मराठवाडा रेल्वे  प्रवासी महासंघाच्या  पदाधिकार्‍यांना दिली. (Nanded-Pune Express will run with modern coaches)

शनिवारी दानवे परभणी जिल्ह्याच्या दौर्‍यावर होते. त्यावेळी ते आ. मेघनाताई बोर्डीकर यांच्या निवासस्थानी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाच्या शिष्टमंडळाला ही माहिती दिली.

 

यावेळी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, आ.मेघनाताई बोर्डीकर, आनंद भरोसे हे उपस्थित होते. मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाच्या शिष्टमंडळात अरुण मेघराज, राजेंद्र मुंढे, प्रा.सुरेश नाईकवाडे, रितेश जैन, प्रवीण थानवी, रवी किरण गंभीरे यांचा समावेश होता.

 

नांदेड, परभणी, जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील नागरिकांना पुणे येथे येण्यासाठी मानमाडमार्गे आठवड्यातून रविवार आणि मंगळवारी असे दोनच दिवस नांदेड-हडपसर सुपरफास्ट ही रेल्वे आहे. त्यामुळे इतर दिवशी नागरिकांना खासगी वाहनाने पुणे येथे जावे लागते. त्यामुळे नांदेड-हडपसर एक्सप्रेस ही रेल्वे दररोज करा, अशी मागणी केली. त्यावेळी ही रेल्वे आता दररोज धावेल, अशी माहिती दिली. (Nanded-Pune Express will run with modern coaches)

 

 

मनमाड ते औरंगाबाद पर्यंत दुहेरीकरणाला मंजुरी देण्यात आली असून, पुढील टप्प्यात औरंगाबाद ते परभणी दरम्यानच्या दुहेरीकरणाचे काम देखील पूर्ण होईल. पुढील महिन्यात जालना स्थानकावर पीट लाइनचे उद्घाटन केले जाणार आहे. औरंगाबाद येथे देखील एक पीट लाइन होणार असल्याची माहिती दिली. पंढरपूर रेल्वे परत येताना लातूर रोड स्थानकावर दररोज तीन-तीन तासापर्यंत उभी केली जाते, असे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर दावणे यांनी संबंधित रेल्वे अधिकार्‍यांना फोनवरून कोणत्याही रेल्वे स्थानकावर पंढरपूर रेल्वेला विनाकारण उभे करू नका, अशा सूचना दिल्या आहेत. विभागातील सर्व रेल्वे गाड्यांचा लूज टाइम रद्द करण्यासोबत मुंबई-नांदेड राज्यराणी एक्सप्रेसला अतिरिक्त स्लिपर लावण्यासाठी अधिकार्‍यांना आदेश दिले आहेत.

Local ad 1