Nanded political news । शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे भाजपात दाखल
Nanded political news । नांदेड : राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्याने काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात शिवसेना उमेदवार देणार नाही. त्यामुळे शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. साबणे आता भाजपकडून देगलूर विधानसभा निवडणुकीच्या (Deglaur Assembly by-election) रिंगणात उतरणार हे निश्चित झाले आहे. (Former Shiv Sena MLA Subhash Sabne)
देगलूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार रावसाहेब अंतपुरकर (MLA Raosaheb Antpurkar) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पोट निवडणूक सुरू आहे. अंतपुरकर हे काँग्रेसचे आमदार होते, त्यामुळे महाविकास आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपला उमेदवार देणार नाहीत. त्यामुळे आमदार होण्याची आपली संधी जाईल, या शक्यतेने गेल्या काही महिन्यांपासून साबणे पक्षांतर आणि उमेदवारी कोणत्या पक्षाची घ्यायची, याविषयी चाचपणी करत होते. देगलूर विधानसभा मतदार संघ हा राखीव असल्याने याठिकाणी निवडणुकीत उमेदवारी द्या अशी मागणी सुमारे बारा जणांनी केल्याची माहिती समोर आली होती. या सर्व इच्छुकांना डावळून साबणे यांना पक्षात प्रवेश देऊन, साबणे यांना उमेदवारी दिली देण्यात आली. (Former Shiv Sena MLA Subhash Sabne)