Nanded Municipal Corporation नांदेड महापालिकेत पावडेवाडीचा समावेश नको : खासदार चिखलीकर

नांदेड | पुणे महापालिकेच्या हद्दीलगत असलेल्या 23 गावांचा पुणे महापालिकेत समावेश करण्यात आला आहे.  त्यानंतर आता नांदेड वाघाळा महापालिकेच्या लगत असलेल्या पावडेवाडी ग्रामपंचायतीचा समावेशाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. समावेश करु नका, अशी मागणी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी विधानसभेचे  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. The issue of Nanded Municipal Corporation has come to the fore after the demarcation of Pune Municipal Corporation

नांदेड महापालिकेलगत असलेल्या पावडेवाडीसह अन्य काही गावे महापालिकेत समाविष्ट करण्यासंदर्भात चर्चा सुरु आहे. त्यातच पुणे महापालिकेत 23 गावे समाविष्ट करण्याची अधिसूचना जारी करण्यात आली. The issue of Nanded Municipal Corporation has come to the fore after the demarcation of Pune Municipal Corporation

दरम्यान, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या हद्दवाढीत पावडेवाडी ग्रामपंचायतचा समावेश करण्यात येवू नये, अशी ग्रामस्थांची मागणी असल्याचे निवेदन खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट भाजपा शिष्टमंडळाने घेतली. यावेळी आ.तुषार राठोड, आ.भिमराव केराम, भाजपा जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगांवकर, लक्ष्मणराव ठक्करवाड, डॉ.अजित घोपछडे आदिंची उपस्थिती होती. या संदर्भात खासदार चिखलीकर यांनी फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती बुधवारी रात्री फोसबुकपेजवरुन दिली आहे. The issue of Nanded Municipal Corporation has come to the fore after the demarcation of Pune Municipal Corporation

Local ad 1