कंधार kandhar news : तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर (Nanded district heavy rainfall) कौठा, शिरूर व बारुळ परिसरात भेट देऊन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी आणि पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांशी संवाद साधला. यावेळी तहसिलदार व्यंकटेश मुडे, तालुका कृषी आधिकारी रमेश देशमुख याना सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले.
यावेळी कौठा, राऊतखेड, धानोरा , शिरुर व काटकंळबा येथील शेतकऱ्यांनी खा.चिखलीकर याना निवेदन दिले. त्यात नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई हक्काचा पिकविमा मिळवुन देण्याची मागणी केली आहे.
कंधार तालुक्यात दि ६ व ७ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. या भागाची पाहाणी करण्यासाठी खासदार प्रताप पाटील यांनी कौठा, शिरुर, चौकिमहाकाया, राऊतखेड, धानोरा, शिरुर, तेलुर आणि काटकंळबा येथील शेतकऱ्यांशी कौठा येथे संवाद साधला. नुकसान भरपाई मिळवुन देण्याचे आश्वासन दिले.