पूरग्रस्तांना तातडीची मदत करा : खासदार प्रताप पाटील चिखलीकर

नांदेड Nanded news : जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे (Nanded district heavy rainfall) शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, जीवितहानीही झाली आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागास अतिवृष्टीचा फटका बसला असल्याने नांदेड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर (Declare a wet drought) करून तातडीची मदत द्यावी, अशी मागणी नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर (Nanded MP Pratap Patil Chikhlikar) यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडे केली आहे. 

 

नांदेड जिल्ह्यात नदी-नाल्यांना पूर आला आहे. (The river nallas in the district are flooded ) गोदावरीसह जिल्ह्यातील इतर नद्या दुथडी भरून वाहत असल्याने उपनद्यांचे पाणी थांबले आहे. (Godavari and other rivers in the district are overflowing) त्यामुळे सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे शेती पाण्याखाली आली आहे. मुखेड तालुक्यात (Mukhed taluka) पुराच्या पाण्यात दोघे जण वाहून गेले तर सावरगाव चा तलाव फुटला आहे .

 

तातडीची मदत करा..
नायगाव, देगलूर, बिलोली, धर्माबाद, कुंडलवाडी, लोहा , कंधार, हदगाव अर्धापूर, मुदखेड, भोकर या सर्व भागाला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. (Naigaon, Deglur, Biloli, Dharmabad, Kundalwadi, Loha, Kandhar, Hadgaon, Ardhapur, Mudkhed, Bhokar have all been hit by heavy rains.) शिवाय नांदेड शहरातील अनेक सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. सर्वसामान्य नागरिकांना आणि शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने अतिवृष्टीग्रस्तांना आर्थिक मदत द्यावी, (The state government should immediately provide financial assistance to the flood victims) ज्यांचे संसारोपयोगी साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेले अथवा पाण्याने बाधित झाली आहे, अशा नुकसानग्रस्तांना तातडीने संसारोपयोगी साहित्य आणि तीन महिने पुरेल इतके अन्नधान्य पुरवठा करावे, अशी मागणी केली आहे.

 

पुराच्या पाण्यात मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना तातडीची दहा लाख रुपयांची आर्थिक मदत करावी, (Immediate financial assistance of Rs. 10 lakhs should be given to the heirs of those who died in the flood waters.) शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे तात्काळ करत शेतकऱ्यांच्या खात्यावर आर्थिक मदत जमा करावी, अशी मागणी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केली आहे. (Nanded MP Pratap Patil Chikhlikar)

नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे

नांदेड जिल्ह्यातील (Nanded District) अतिवृष्टीच्या अनुषंगाने आपण प्रशासनाची संपर्क ठेवून आहोत. पूर परिस्थिती नियंत्रण आणि बचाव कार्य नीटपणे सुरू ठेवण्याबाबत ही प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये मात्र अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता घराबाहेर पडू नये. नदी नाल्याचे पाणी ओलांडू नये स्वतः सुरक्षित राहून इतरांना सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर (Nanded MP Pratap Patil Chikhlikar) यांनी केले यांनी केली आहे.

 

 

Local ad 1