नांदेड लोकसभा पोट निवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार जाहीर 

Nanded Loksabha By-Election Congress Candidate : राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. येत्या २० नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यापाठोपाठ आता रिक्त झालेल्या लोकसभा मतदारसंघांची पोटनिवडणुकांचीही घोषणा करण्यात आली आहे. नांदेड लोकसभा मतदासंघांचे काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनाने रिक्त झालेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. आता नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. वसंत चव्हाण यांचे सुपुत्र रवींद्र चव्हाण हे नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.