Nanded Loksabha By-Election Congress Candidate : राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. येत्या २० नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यापाठोपाठ आता रिक्त झालेल्या लोकसभा मतदारसंघांची पोटनिवडणुकांचीही घोषणा करण्यात आली आहे. नांदेड लोकसभा मतदासंघांचे काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनाने रिक्त झालेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. आता नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. वसंत चव्हाण यांचे सुपुत्र रवींद्र चव्हाण हे नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. (Congress candidate announced for Nanded Lok Sabha by-election)
New voters register। नव मतदारांनो मतदार यादीत नाव नोंदवा अन् विधानसभेसाठी मतदान करा
काँग्रेसने एक परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकात काँग्रेसकडून नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला आहे. वसंत चव्हाण यांच्या निधनामुळे नांदेड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या मतदारसंघातून वसंत चव्हाण यांचे सुपुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. (Nanded Loksabha By-Election Congress Candidate)
विधानसभा आणि लोकसभेची पोट निवडणूक एकत्रच होणार असल्याने मतदारांच्या मनातील संभ्रम दुर झाल्यानंतर काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी के. सी. वेणूगोपाल यांनी गुरुवारी एक प्रसिद्धी पत्रक काढून दिवंगत खा. वसंतराव चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना नांदेड लोकसभा पोट निवडणुकीची उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. (Nanded Loksabha By-Election Congress Candidate)
खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघातील जागेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. तसेच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीबरोबरच २० नोव्हेंबर रोजी नांदेड लोकसभेच्या जागेसाठी मतदान होणार आहे. दरम्यान, नांदेड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवार घोषित केला असून, दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे २६ ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. वसंतराव चव्हाण यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा पराभव केला होता. मात्र ही निवडणूक आटोपल्यानंतर काही काळानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत समस्या निर्माण झाली होती. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी हैदराबाद येते नेण्यात आले होते. मात्र तिथेच त्यांचं निधन झाले आहे.
दरम्यान, वसंतराव चव्हाण यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या नांदेड लोकसभेच्या जागेवर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा होती. अखेर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र रवींद्र चव्हाण यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले आहे.