गांजाची शेती : (lcb) काही तासांतच अधिकाऱ्याची मुख्यालयात उचलबांगडी

नायगांव ः नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेने कुंटुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गांजाची शेती उघडकीस आणली.  त्यामुळे स्थानिक पोलिसांची निष्क्रियता सिद्ध झाली. त्यापुर्वी या हद्दीत अनेक प्रकार घडले. पंरतु  त्याची वाचाता कुठे हा होणार नाही, तजविज करण्यात आल्याची चर्चा होत आहे. कुंटूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक करीम पठाण यांची काही तासांतच मुख्यालयात उचलबांगडी करण्यात आली. त्यामुळे बदली कोणत्या कारणामुळे केली गेली, याविषयी जोरदार चर्चा सुरु आहे. (Nanded local crime branch police lcb) 

नायगांव तालुक्यातील कुष्णुर येथे पंचताारांकीत औद्योगिक वसाहत असून, त्याठिकाणी काही दिवसांपुर्वी हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर कारवाई करण्यात आली होती. त्याठिकाणावरुन जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात हेराफेरी झाल्याची दबक्या चर्चा होत होती. त्यातच  मंगळवारी हरनाळा येथे स्थागुशाने गांजा प्रकरणात केलेली कारवाई स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह उभे करणारी आहे. (Nanded local crime branch police lcb


     

   कुंटूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक करीम पठाण यांच्या कामकाजाविषयी नायंगाव विधानसभा मतदारसंघाचे  आ. राजेश पवार यांनी सातत्याने वरिष्ठाकडे तक्रारी केल्या होत्या. परंतु जिल्हा पोलीस अधिक्षकांनी त्याकडे कानाडोळा केला. परिमाणी  मटका, जुगार व अवैध दारु विक्रेत्यांनी थैमान घातले. कुष्णूर येथील हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावरील कारवाई संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याने या प्रकरणाचा तपास बिलोली उपविभागीय पोलीस अधिकारी सिध्देश्वर धुमाळ यांचेकडे सोपविण्यात आला. तर दुसरीकडे  औराळा येथील एका प्रकरणात तक्रारदारालाच दमदाटी करुन गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्या प्रकरणी किरण वाघमारे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण केले. (Nanded local crime branch police lcb)    

 दरम्यान, हद्दीतील गांजी शेती आणि चर्चेत असलेल्या जुगार अड्ड्यातील कारवाईमुळे  पठाण यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात असल्याची चर्चा नायगांव तालुक्यात सुरु आहे. तर पठाण यांच्या समर्थकाकडून मात्र कार्यकाळ पुर्ण झाल्याने बदली करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे कारण काही असे, उचलबांगडी मात्र झाली. (Nanded local crime branch police lcb)

Local ad 1