नांदेडमध्ये कोरोना चाचण्या घटल्या ; आज किती रुग्ण सापडले, जाणून घ्या…
नांदेड : नांदेड शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्ण आढळत आहेत. दररोज दोन हजाराहून अधिक चाचण्या केल्या जात होत्या. परंतु, सोमवारी चाचण्यांची संख्या तुलनेत कमी झाल्या आहेत. त्यात 1253 जणांची चाचणी करण्यात आली आहे. त्यातून 420 जण बाधित आढळले आहेत. त्यात नांदेड महापालिका हद्दीतील 296 रुग्ण आहेत. तर 201 रुग्ण बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. (Tests were reduced in Nanded, how many patients were found today)
जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 253 अहवालापैकी 420 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 385 तर अँटिजेन तपासणीद्वारे 35 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 94 हजार 205 एवढी झाली असून यातील 88 हजार 584 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 2 हजार 966 रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. (Tests were reduced in Nanded, how many patients were found today)
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 276, नांदेड ग्रामीण 41, भोकर 2, देगलूर 4, धर्माबाद 6, हिमायतनगर 1, कंधार 2, किनवट 22, लोहा 2, मुदखेड 2, मुखेड 5, नायगाव 1, उमरी 2, बिलोली 2, अर्धापूर 3, परभणी 2, उदगीर 4, हैदराबाद 1, यवतमाळ 1, वर्धा 1, जयपूर 1, हिंगोली 3, मुंबई 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 20, नांदेड ग्रामीण 2, देगलूर 6, धर्माबाद 7 असे एकूण 420 कोरोना बाधित आढळले आहे. आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 164, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 3, खाजगी रुग्णालय 6, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 26 कोरोना बाधिताला औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली. (Tests were reduced in Nanded, how many patients were found today)
Related Posts
आज 2 हजार 966 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 29, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 7, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 601, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 2 हजार 309, खाजगी रुग्णालय 17, हदगाव कोविड रुग्णालय 1, बिलोली कोविड रुग्णालय 2 अशा एकुण 2 हजार 966 व्यक्ती उपचार घेत आहेत.