Nanded Farmer News । नांदेड जिल्हा व इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी मार्च महिन्यात 4 ते 8 मार्च या कालावधीत तसेच दिनांक 16 ते 19 मार्च या काळात पडलेल्या अवेळी पावसामुळे काही शेतकऱ्यांना अतोनात नुकसान सहन करावे लागले. (Nanded Farmer News 30 crore 52 lakhs assistance to farmers of Nanded district)
महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना वेळीच मदतीचा हात पोहचावा या उद्देशाने तातडीने 177 कोटी 80 लक्ष 61 हजार एवढा निधी 10 एप्रिल रोजी शासन निर्णय काढून संबंधित विभागांना प्रदान करण्यात आला. यासाठी नांदेड जिल्ह्याला 30 कोटी 52 लक्ष 13 हजार एवढा निधी प्राप्त झाला आहे. (Nanded Farmer News 30 crore 52 lakhs assistance to farmers of Nanded district)