नांदेड : संभाजीनगर, बीड, लातूर, परभणी (Sambhajinagar, Beed, Latur, Parbhani) जिल्ह्यातील आमदारांना मंत्री पदाची लॉटरी लागली आहे. तर नांदेड, हिंगोली, जालना आणि धाराशिव जिल्ह्यातील एकही आमदाराला मंत्री पादची संधी मिळाली नाही. परळीमधून मुंडे बंधू भगिनीची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. तर संभाजीनगरमधील भाजपचे अतुल सावे आणि शिवसेनेचे संजय सिरसाट यांनी शपथ घेतली आहे. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (अजित पवार) पक्षाकडून विजयी झालेल्या बाबासाहेब पाटील आणि परभणी जिल्ह्यातील जिंतूर विधानसभा मतदार संघातील मेघना बोर्डीकर यांनी राज्य मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. (Nanded district will get a guardian minister from outside again!)
Pune Crime News : मित्रासाठी काय पण..! थेट केला गोळीबार अन् जावे लागले तुरुंगात
औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे आमदार अतुल सावे यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. एआयएमआयएमचे उमेदवार इम्तियाझ जलील (
AIMIM’s Imtiaz Jalil) यांचा पराभव करून ते निवडून आले आहेत.अतुल सावे याआधी देखील मंत्री राहिलेले आहेत. औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांनी मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात त्यांना मंत्रिपद मिळालेले नव्हते. यावेळी मात्र संजय शिरसाट यांना मंत्रिपद देण्यात आले आहे.लातूर जिल्ह्यातील अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. बाबासाहेब पाटील हे मराठवाड्यातून आहेत. परभणी जिल्ह्यातील जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनीही राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. मेघना बोर्डीकर 2019 मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. ज्येष्ठ नेते रामप्रसाद बोर्डीकर यांच्या त्या कन्या आहेत.