...

नांदेडमध्ये भाजपला पुन्हा झटका ; ‘हे’ नेते करणार काँग्रेसमध्ये घरवापसी

नांदेड (विशेष प्रतिनिधी) : देगलूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक सुरू असून, त्यात राजकीय उलथापालथ होत आहेत. नुकतेच माजी खासदार, माजी आमदाराने भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देत पुन्हा काँग्रेसचा ‘हात’ हातात घेत घरवापसी केली. त्यातच अजून माजी आमदार आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्षाने भाजपला सोडचिठ्ठी दिली. पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. (BJP hit again in Nanded district; ‘This’ leader will return to Congress,)

 

 

*नांदेड जिल्ह्यात भाजपला मोठे खिंडार ; “हा” मोठा नेता जाणार काँग्रेसमध्ये*
👇👇

नांदेड जिल्ह्यात भाजपला मोठे खिंडार ; “हा” मोठा नेता जाणार काँग्रेसमध्ये

 

 

नांदेड जिल्ह्यात अनेक भाजप नेते हे काँग्रेसमधून आयात केलेले आहेत. परंतु, त्यांना योग्य सन्मान मिळत नसल्याचे सांगत त्यांनी पुन्हा काँग्रेसचा ‘हात’ हातात घेत आहेत. त्याचा कितपत परिणाम सध्या सुरू असलेल्या देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीवर होईल, हे निकालानंतर स्पष्ट होईल. परंतु त्यापूर्वीच देगलूर, बिलोली तालुक्यात वजन असलेले माजी मंत्री तथा माजी खासदार भास्करराव पाटील खातगावर यांनी आपल्या समर्थकांसह भाजपला सोडचिठ्ठी देत पुन्हा काँग्रेसचा ‘हात’ हातात घेतला. दरम्यान, या पक्षांतराचा काहीही परिणाम होणार नाही, असे भाजप नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. (BJP hit again in Nanded district; ‘This’ leader will return to Congress,)

 

“नांदेड जिल्हा भाजपमध्ये सुरू असलेल्या घडामोडीमुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पक्ष संघटनेत यापुढे कार्यरत राहणे योग्य वाटत नाही”, आशा शब्दांत मुखेडचे माजी आमदार अविनाश घाटे यांनी आपल्या भावना व्यक्त करत भाजपचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजनीम भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे दिला आहे. याबरोबरच नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीराम पाटील राजूरकर यांनीही भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. हे दोन्ही नेते पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. (BJP hit again in Nanded district; ‘This’ leader will return to Congress,)

Local ad 1